आवंढीतील सावकार डेअरीतील दुध उत्पादकांची दिवाळी गोड
संकेत टाइम्स,आवंढी :जत तालुक्यातील आवंढी येथील सावकार उद्योग समूहाचे मालक शशिकांत उर्फ बबलू (शेठ)कोडग यांनी गावात सावकार डेअरी फार्म व पशुखाद्य विक्री केंद्र सुरु केले आहे. ना नफा ना तोटा या तत्वावर हा उद्योग सुरू करण्यात आला आहे.अल्पावधित डेअरीकडून दुधाला उत्तम भाव देत बळीराजाचा विश्वास संपादन केला गेला.तसेच दूध दरात कुठलीही कपात न करता दुध उत्पादकांना दिवाळीनिमित्त दिवाळीचे संपूर्ण किराणा किट दिवाळी बोनस म्हणून भेट देण्यात आले आहे.
एकीकडे सहकारी दुध उत्पादक संस्था आणि डेअरी मार्फत शेतकऱ्यांच्या दुधाला अत्यल्प दर दिला जात आहे.मात्र कोडग यांनी दुग्ध व्यवसाय करताना शेतकऱ्याचेही हितही जोपासले आहे.त्यांच्या या उपक्रमाचे बळीराजासह सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे. यावेळी माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आण्णासाहेब कोडग, उद्योगपती दिनेश सोळगे,डॉ.आण्णासाहेब कोडग, बापू तोरणे, दगडू दादा,विक्रम कोडग,महादेव कोडग व सर्व दुध उत्पादक उपस्थित होते.