Header Ads

माणिकनाळ येथे जय हनुमान सोसायटीचे‌ उद्घाटन

करजगी : माणिकनाळ ता.जत येथील जय हनुमान विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची नव्याने स्थापना करण्यात आली आहे.दसरा शुभ मुहूर्तावर माजी आमदार विलासराव जगताप यांच्या  अध्यक्षतेखाली,सहाय्यक निबंधक अमोल डफळे यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले.



यावेळी मन्सूर खतीब,सुभाष पाटील,अँड अडव्यप्पा घेरडे, मल्लिकार्जुन बालगांव,सिद्धगोंडा बगली यांनी सोसायटी स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले.सरपंच रखमाबाई घेरडे, उपसरपंच श्रीशैल बगली, महादेवप्पा मेडिदार,विठ्ठल गडदे,रफीकअहमद पटेल,धरेप्पा कट्टीमनी, माळू कळळी,नागराज बमनाळे,नागप्‍पा हांजगी,ज्ञानेश्वर बमनळी आदी मान्यवर उपस्थित होते.

Blogger द्वारे प्रायोजित.