जत : धनश्री मल्टीस्टेट संस्थेने अल्पावधीत सभासदांचा विश्वास संपादन केला असून ही संस्था सर्वसामान्य व गोरगरिबांचा आधारवड बनली आहे, असे प्रतिपादन श्री संत बागडेबाबा महाराज मठाचे मठाधिपती ह.भ.प. तुकारामबाबा महाराज यांनी केले.
जत शहरातील धनश्री मल्टीस्टेट संस्थेच्या वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला त्यावेळी तुकाराम बाबा बोलत होते यावेळी संस्थेचे संस्थापक शिवाजीराव काळुंगे, संचालक यदाप्पा माळी, मारुती सावंत उपस्थित होते. सहाय्यक निबंधक अमोल डफळे, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे, केंद्रीय सिमेंट बोर्डाचे संचालक डॉ. रवींद्र आरळी यांनी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
तुकारामबाबा महाराज म्हणाले, जतची शाखा सुरू होऊन ११ वर्षे झाली. या काळात संस्थेत ३१ कोटीच्या ठेवी जमा केल्या आहेत. याचाच अर्थ या संस्थेने ग्राहकांचा व सभासदांचा विश्वास संपादन केला आहे. संस्थेत शिक्षित व प्रशिक्षित कर्मचारी वर्ग आहेत संस्था पारदर्शक व्यवहार करीत असल्याने ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. संस्थेत सर्व प्रकारचे बँकिंग व्यवहार एनईएफटी आरटीजीएस ची सुविधा करून देण्यात आली आहे. बेरोजगार युवक छोटे मोठे व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करीत असतात.
हे व्यवसाय सुरू करताना व सांभाळताना अनेक अडचणींना समोरे जावे लागते. विशेष करून आर्थिक चनचणीला तोंड द्यावे लागत असते.पानटपरी, हातगाडे, फळ भाजीपाला विक्रते, किराणा, जनरल स्टोअर्स, कापड दुकान या व्यापाऱ्यांना बचतीची सवय लावून आर्थिक मदत करण्यात या संस्थेचा वाटा मोठा आहे.
शिवाजीराव काळुंगे म्हणाले, संस्थेची जत शाखा सुरू झाल्यापासून शहरातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी संस्थेला सहकार्य केल्यानेच संस्था नावारूपाला येत आहे. धार्मिक अध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रात तुकारामबाबांचे काम उल्लेखनीय आहे. त्यांनी व सर्वसामान्य सभासदांनी संस्थेवर दाखविलेल्या विश्वासावरच ही संस्था प्रगती पथावर पोहचली आहे.यावेळी सचिव राजेंद्र पोकळे, सुखदेव हारगे, मोहम्मदसलीम मकानदार,दिपाली यादव, आरती क्षीरसागर,हर्षद मणेर,चिकय्या मठपती, प्रशांत तूपसौंदर्य उपस्थित होते.