Header Ads

पाणी योजनेच्या बिलासाठी ३ टक्के लाच स्विकारताना महिला उपअभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात


कोल्हापूर : पाणी योजनेचे बिल मंजूर करण्यासाठी तीन टक्के लाच मागणाऱ्या महिला उपअभियंत्याला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले आहे.कोल्हापूर ‌येथे ही लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे.


जलजीवन नळपाणी पुरवठा कामाचे 12 लाख रुपयांचे बिल मंजूर केलं म्हणून तीन टक्के कमिशन म्हणून 33 हजार रुपयांची मागणी चंदगड ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची उपअभियंता सुभद्रा लक्ष्मणराव कांबळे (रा. बेळगाव,सध्या रा.कल्याण) यांनी केली होती. तडजोडीअंती पंचवीस हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना सुभद्राला रंगेहाथ लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी पकडले.या प्रकरणातील तक्रार करणारा ठेकेदार असून त्यांने याबाबत लाचलुपतच विभागाकडे तक्रार दाखल केली होती. 


मुख्य ठेकेदारांनी जलजीवन मिशन योजनेंतर्गत घुल्लेवाडी ता.चंदगड मधील जलजीवन नळपाणी पुरवठा योजना सुधारीकरणाचे काम घेतलं होतं.झालेल्या कामाचे मंजूर बिल 12 लाख रुपयांच्या बिलातूव उपअभियंता असलेल्या सुभद्रा कांबळेनं यांनी तीन टक्के प्रमाणे 33 हजार रुपये लाचेची मागणी तक्रारदार ठेकेदाराकडे केली होती. तडजोडीअंती 25 हजार रुपये लाच देण्याचे ठरले होते. लाचेची ठरलेली रक्कम तक्रारदाराकडून स्वतः सुभद्रा या स्वीकारताना रचून रंगेहाथ पकडले.या प्रकरणी चंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Blogger द्वारे प्रायोजित.