Header Ads

कवठेमहांकाळ येथे विधी साक्षरता शिबिर संपन्न


कवठेमहांकाळ : देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली परंतु सर्वसामान्य नागरिकांना अद्याप कायद्याचे ज्ञान नाही त्यामुळे अनेक लोक कायद्याच्या अज्ञानामुळे भरडले जात आहेत.याची दखल घेऊन सर्वसामान्यांना न्याय मिळावा,त्यांना कायद्याचे ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी आता न्यायालय देखील प्रत्येकाच्या दारापर्यंत येत आहे.न्यायाधीशांमार्फत गावागावात जाऊन मार्गदर्शन करण्यासाठी सरकारचे निर्देश आहेत.याच दृष्टिकोनातून प्रत्येक गाव पातळीवर कायदा साक्षरता शिबिर आयोजन केले जात आहे.

आज दिनांक ८ नोव्हेंबर रोजी कवठे महांकाळ येथील नगर पंचायतीच्या सभागृहात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,तालुका विधी सेवा समिती आणि वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कायदा साक्षरता शिबिर आयोजित करण्यात आले होते.

प्रारंभी उपस्थितांचे स्वागत कवठे महांकाळ वकील संघटनेचे अध्यक्ष व्ही.एस.कदम यांनी केले.यावेळी न्यायाधीश अरुण व्यवहारे यांनी उपस्थितांना दैनदिन जीवनात वावरत असताना सामान्य नागरिकांना असलेले हक्क आणि अधिकार याबाबत मार्गदर्शन केले.यासोबत उपस्थित वकिलांनी बालविवाह,कुळ कायदा,शिक्षण हक्क,वारसा हक्क,स्त्री अत्याचार रोखण्यासाठी असलेले कायदे या आणि इतर अनेक कायद्याविषयी माहिती दिली.सहा.पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांनी महिलांना अत्याचाराविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताना असलेले अधिकार आणि नियम याबाबत माहिती दिली.

           
याप्रसंगी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहराध्यक्षा मीनाक्षी माने,कवठे महांकाळ वकील संघटनेचे अध्यक्ष व्ही.एस.कदम,तसेच संघटनेचे सदस्य अतुल पवार,उमेश पाटील,सविता पवार,युवराज ओहोळ तसेच सहा.पोलीस निरीक्षक शिवाजी करे,सुभाष जाधव,गजानन करांडे,प्रदीप खोत,रत्नदीप ओतरी,एन.ए.दुर्गाडे(माळी),छाया वाले,वैशाली राक्षे,अर्चना मोहिते,शैला ओव्हाळे,कल्पना पाटील,अंगणवाडी सुपरवायजर सौ.माळी यांच्यासोबत इतर पोलीस कर्मचारी,कवठे महांकाळ नगर पंचायतीचे कर्मचारी,अंगणवाडी सेविका आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
Blogger द्वारे प्रायोजित.