Header Ads

माफी काफी नाही,गद्दार सत्तारांचा राजीनामाच घ्या,कवठेमहांकाळ राष्ट्रवादीची मागणी


कवठेमहांकाळ : सुसंस्कृत महाराष्ट्र अशी देशात वेगळी ओळख असलेल्या पुरोगामी महाराष्ट्राची राजकारणातील संस्कृती आहे.लोकशाही म्हटले की,टीका टिप्पणी आलीच तो राजकारणाचा एक भाग आहे,मात्र टीका टिप्पणी करताना मर्यादा पाळणे गरजेचे आहे.दुर्दैवाने खा.सुप्रिया सुळे यांच्याबाबत अतिशय खालच्या थराची वापरलेली भाषा पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नाही.ती या पुरोगामी महाराष्ट्राची संस्कृती नाही.त्यामुळे खा.सुप्रिया सुळे यांच्याबाबतीत अशा प्रकारचे वक्तव्य हे निंदनीय व निषेधार्ह आहे.याची दखल घेत कवठे महांकाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार सुमनताई आर.आर.(आबा)पाटील,सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेशभाऊ पाटील,युवा नेते रोहीतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील नेते आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा काढत त्यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन करण्यात आले.

          
अब्दुल सत्तार यांनी माफी मागितली असली तरी माफी काफी नाही,सत्तार यांनी राजीनामा दिला पाहिजे.ज्यामुळे पुन्हा कोणी महिलांच्या बाबतीत अशी खालच्या पातळीवर जाऊन टीका करणार नाही.राष्ट्रवादीने नेहमीच महिलांचा सन्मान केला आहे.ही शिकवण आम्हाला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेबांनी दिली आहे.पवार साहेबांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण मिळाले.त्यामुळे आज पुरुषांच्या बरोबरीने महिला समाजामध्ये ताठ मानेने वावरत आहेत. 
                 
हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे.राजकीय आरोप एकमेकांवर होत असतात,परंतु सत्तेत असलेल्या आणि भाजपाबरोबर सत्तेत सहभागी असलेल्या अब्दुल सत्तार यांनी महिला खासदाराला चक्क शिवीगाळ करणे हे अशोभनीय आहे.हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न पटणारे आहे त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा असे मत मोर्चात सहभागी महिला आघाडीच्या पदाधिकारी यांनी व्यक्त केले.
       

याप्रसंगी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहराध्यक्षा मीनाक्षी माने,तालुकाध्यक्षा सुरेखा कोळेकर,तालुका उपाध्यक्षा पवित्रा खोत,जिल्हा चिटणीस छाया शेजाळ,युवती तालुका अध्यक्षा सायली जाधव,दिपाली जाधव,प्राजक्ता बोगार,तालुका अध्यक्ष महेश पवार,राष्ट्रवादीचे युवक शहर अध्यक्ष महेश पाटील,नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष बद्द्रूद्दिन शिरोळकर,शहर उपाध्यक्ष ईश्वर वणखडे,कोषाध्यक्ष रवी माने,नगरसेवक संजय माने,हणमंत आप्पा देसाई,संजय कोठावळे तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी,महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


मंत्री सत्तार यांच्या विरोधात कवठेमहाकांळ येथे राष्ट्रवादी कॉग्रेसकडून आंदोलन करण्यात आले.
Blogger द्वारे प्रायोजित.