Header Ads

उमदीत सुसज्ज पोलिस कर्मचारी निवासस्थान बांधावे | पोलिस अधीक्षक यांच्याकडे संजय तेली यांची निवेदनाद्वारे मागणी


संख : सांगली जिल्ह्याचे नुतन पोलिस अधीक्षक बसवराज तेली यांची भेट घेत जत तालुक्यातील उमदी पोलिसांना निवासस्थान बांधून द्यावीत, अशी मागणी युवा नेते संजय तेली व मलुआण्णा सालुटगी यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, जत हा तालुका महाराष्ट्रातील सर्वात शेवटचा विधानसभा मतदारसंघ आहे.उमदी हे जिल्ह्यातील सर्वात शेवटचे, सीमावर्ती भागातील पोलीस ठाणे आहे. सदरचा भाग हा कर्नाटक सीमेलगत असल्याने संवेदनशील आहे. त्यामुळे या भागातील पोलीस यंत्रणेला योग्य त्या सुविधा मिळणे अत्यंत आवश्यक आहे. हा ग्रामीण भाग असल्यामुळे निवासाची योग्य सुविधा उपलब्ध नाही. उमदी येथे पोलिसांची जुनी चाळ आहे तीच घरे अनेकदा दुरुस्त करून वापरली जातात. 

मात्र सध्या त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. मनुष्यवस्ती करण्याच्या योग्यतेची सदरची निवासस्थानी नाहीत.‌त्यामुळे पोलीस कर्मचारी व अधिकारी यांची गैरसोय होत आहे.आपल्या विभागाकडून पोलिसांसाठी अध्यायावत निवासस्थान उभारण्याची अत्यंत आवश्यकता आहे. उमदी येथील पोलिसांना सर्व सोयीने युक्त निवासस्थाने बांधून द्यावीत. त्यासाठी माननीय गृहमंत्री व उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करणार आहोत. तरी आपल्या स्तरावर योग्य ती कार्यवाही व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.  

यावेळी युवा नेते फिरोज मुल्ला,तालुका उपाध्यक्ष रवी शिवपुरे, माजी उपसरपंच चंद्रकांत नागणे, बसवराज पाटील, बंडा पवार, चिदानंद रगटे, संगु माळी, संगम ममदापुरे, रोहीत शिंदे, राजु चव्हाण सर, अंबादास कोळी, अभिमन्यू लोणी उपस्थित होते.
Blogger द्वारे प्रायोजित.