Header Ads

फॅबटेक पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे अभिनय क्षेत्रात प्राविण्य


सांगोला : फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित फॅबटेक पब्लिक स्कूलचा  चौथीतील विद्यार्थी कु.वेद अमोल लऊळकर याने अभिनय कला क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवले. माता अनुसया प्रोडक्शन मुंबई या संस्थेमार्फत मुलांमधील अभिनय कलेला संधी देण्यासाठी अभिनय स्पर्धेच्या आयोजन केले होते.या स्पर्धैमध्ये वेद लऊळकर याने विशेष प्राविण्य मिळवले. 


माता अनुसया प्रोडक्शन मुंबई ने मुलांचे बालनाट्य बसवून त्याचे प्रयोग नाट्य मंदिरामध्ये घेतले मुलांना स्टेज अनुभव बालपणात मिळाल्यास अभिनय क्षेत्रात आत्मविश्वासाने सामोरे जातात.या संस्थेमार्फत मुलांना चित्रपट सिरीयल व्यावसायिक नाटकांमधून रंगभूमीवर    येतात अशी माहिती, माता अनुसया प्रोडक्शन चे संचालक निर्माते प्रवीण कुमार भारदे यांनी दिली.


Blogger द्वारे प्रायोजित.