Header Ads

उमराणीत कर्नाटकचा झेंडा फडकविला


जत : उमराणी ता.जत येथे कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात येणार असून आम्हाला कर्नाटकात जाण्याची एनओसी द्यावी, अशी मागणी संरपचासह ग्रामस्थांनी केली आहे.महाराष्ट्र -कर्नाटक सिमाभागाचा मुद्या पुन्हा गाजत असताना जत तालुक्यातील काही गावांनी मुख्यमंत्री बोम्मई यांच्या दाव्यानुसार कर्नाटकात जाणार असल्याची घोषणा केली आहे. 


तिकोंडीत शुक्रवारी कर्नाटकचा झेंडा फडकताच रविवारी उमराणीत कर्नाटकचा झेंडा फडकाविण्यात आला.महाराष्ट्र सरकार आम्हच्याकडे दुर्लक्ष करत आहेत.देश स्वतंत्र झाल्यापासून आम्हाला हक्काचे पाणी मिळत नाही.आमच्या गावापासून चार किलोमीटर असणाऱ्या कर्नाटकातील गावांना सिंचन योजनेतून पाणी दिले जाते.मात्र महाराष्ट्रात म्हैसाळचे पाणी देण्यासाठी पंधरा वर्षापेक्षा जास्त काळ गेला आहे.मात्र अद्यापपर्यत आम्हाला पाणी मिळाले नाही.



लगतच्या कर्नाटकात विज मोफत,सोसायट्याची तीन लाखापर्यत बिनव्याजी कर्ज दिली जातात.आम्ही विजबील भरले नाहीतर कर्मचारी घरापर्यत येतात.सोसायटीच्या कर्जासाठी हेलपाटे मारावे लागतात.त्यामुळे कर्नाटक सरकार आम्हचा विकास करेल,असा विश्वास असल्याने आम्हाला कर्नाटकात जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. संरपच,उपसंरपच स्थानिक पदाधिकारी,मोठ्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते.
Blogger द्वारे प्रायोजित.