Header Ads

शिवकृपा पतपेढी परंपरा, सेवा, विश्वास अन् समृद्धीची नातं जपणारी संस्था | ४० व्या वर्षात प्रदार्पण


जत : शिवकृपा सहकारी पतपेढी लि., मुंबई या संस्थेचा ४० वा वर्धापन दिन २२ नोंव्हेबरला साजरा होत आहे.त्यानिमित्त जत शाखेत स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे.संस्थेच्या विकासात व दैदिप्यमान प्रगतीमध्ये संस्थेचे पदाधिकारी, सभासद,कर्मचारी, स्थान अनन्यसाधारण आहे,सर्वाचे सहकार्य आणि स्नेह सोबत आहे, म्हणूनच प्रगतीचे असे पटी-पटीने वाढणारे टप्पे "शिवकृपा"पार करीत आहे.


शिवशंभो अधिष्ठान असलेल्या आपल्या संस्थेने ग्राहकांच्या विश्वासासं पात्र राहुन महाराष्ट्र राज्यात 100 शाखाचं जाळ विस्तारले असून, त्या माध्यमातून 5000 कोटी संमिश्र व्यवसायाकडे आगेकूच करीत संस्था सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे यशस्वी घौडदोड करीत आहे. संस्थेच्या सर्वांगीण नेत्रदीपक कामगिरीमुळे महाराष्ट्र शासनाने सहकरातील मानाचा सर्वोच्च "सहकार भुषण" पुरस्कार देवुन गौरविले आहे.भविष्यात संस्थेच्या विविध ठेवी,कर्जे या योजनेच्या माध्यमातून आपले जीवनमान उचांवण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत,असे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.


संस्था वर्धापन दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या जत शाखा कार्यालयात मंगळवार दिनांक 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता स्नेह संवर्धन -‌‌ दिपपूजन कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
Blogger द्वारे प्रायोजित.