Header Ads

फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये गीत गायन स्पर्धा संपन्न


सांगोला : फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये वैयक्तिक गीत गायन स्पर्धा संपन्न झाली.प्रमुख पाहुणे म्हणून स्कूलचे प्राचार्य सिकंदर पाटील, ए. ओं वर्षा कोळेकर, सुपरवायझर सौ.वनिता बाबर, सांस्कृतिक विभाग प्रमुख समाधान खांडेकर उपस्थित होते.


पूर्वप्राथमिक गट ते मोठा गट यामध्ये शंभर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यामध्ये भारूड,भजन लोकसंगीत, बालगीते, देशभक्तीपर अशी अनेकविध गाणी विद्यार्थ्यांनी तालासुरात गायली. डॉ अमोल रणदिवे,श्री.आतिश बनसोडे हे परीक्षक म्हणून होते.

Blogger द्वारे प्रायोजित.