कवयित्री सुरेखा कांबळे यांना समाजभूषण पुरस्कार
कवठेमहांकाळ : बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघ, यांच्या वतीने सुरेखा कांबळे यांना,त्यांनी केलेल्या सामाजिक शैक्षणिक कार्याबद्दल छत्रपती शिव, शाहू, फुले, आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले. शनिवार दि 1 ऑक्टोबर रोजी बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाची बैठक सांगली येथे संपन्न झाली.यावेळी पुरस्कार वितरण करण्यात आले.
राज्य अध्यक्ष एस आर भोसले, पुणे विभागीय अध्यक्ष विजयकुमार कांबळे जिल्हाध्यक्ष देविदास जानकर,प्रा.बाळासाहेब करपे, कार्याध्यक्ष संजय सावंत, संघटक राजेंद्र कांबळे, सरचिटणीस सिद्धार्थ कांबळे,रमेश कांबळे, प्रज्ञावंत कांबळे,जगन्नाथ मोरे,प्रशांत चंदनशिवे,सातीश कोलप,प्रशांत चंदनशिवे इ अनेक पदाधिकारी उपस्थित होते.सुरेखा कांबळे यांची कवठेमहांकाळ तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. लवकरच महासंघाचे भव्य राज्यस्तरीय खुले अधिवेशन घेणेचे ठरले व त्यावर चर्चा करणेत आली उपस्थित सर्वांनी त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .