Header Ads

देशिंग येथील होम मिनिस्टर कार्यक्रम मोठ्या उत्साहात


कवठेमहांकाळ : नवरात्रोत्सव महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कवठे महांकाळ तालुक्यातील देशिंग येथील श्री.अंबिका देवीची यात्रा आणि नवरात्रोत्सवानिमित्त धार्मिक,सांस्कृतिक,समाज प्रबोधनाचे आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.त्याचाच एक भाग म्हणून दि.१ ऑक्टोबर रोजी महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

           
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या कवठे महांकाळ तालुकाध्यक्षा आणि पंचायत समिती,कवठे महांकाळच्या माजी सभापती सौ.सुरेखा कोळेकर यांच्या सौजण्याने हा कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्मिता सगरे आणि कल्याणी माळवदे यांनी केले.या कार्यक्रमास देशींग गावातील तसेच परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

        
या कार्यक्रमा अंतर्गत महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध स्पर्धा घेण्यात आल्या.या स्पर्धेत अनुक्रमे स्नेहल प्रविण खराडे,बालिका चंद्रकांत जगताप,उज्ज्वला पाटील यांनी प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला.या तीनही विजेत्यांना पैठणी बक्षीस स्वरूपात देण्यात आली तसेच अनुक्रमे चार ते दहा क्रमांक पटकावणाऱ्या सुजाता सुरेश सगरे,जयश्री सुरेश पाटिल,मनिषा जनार्दन बंडगर,सरिता रामदास शेंडे,प्रिया सगरे,शारदा बाळासो पाटिल आणि उज्ज्वला सगरे यांना संसार उपयोगी साहित्य बक्षीस स्वरूपात देण्यात आले.

Blogger द्वारे प्रायोजित.