Header Ads

कवठेमहांकाळचे नवदुर्गा सौ.अस्मिता सगरे


कवठेमहांकाळ,संकेत टाइम्स : कवठे महांकाळ येथील सौ.अस्मिता सगरे प्रत्येक स्त्री रुपात देवी आहे.नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने एककीकडे देवीचा उत्सव- जागर होत असताना आजच्या युगातील प्रत्येक स्त्री शक्तीला आदरयुक्त प्रणाम….



स्त्री शक्तीची एकजूट करून त्यांच्या सन्मानासाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी सतत झटणाऱ्या, समाजसेवेचा जणू वसा हाती घेत तन, मन आणि धन अर्पून अविरत सेवाकार्य सुरू ठेवणाऱ्या मालवणच्या सौ.अस्मिता सगरे या खऱ्या अर्थाने आजच्या युगात नवदुर्गेचे रूप आहेत. सौ.अस्मिता उमेश सगरे,रा. कवठेमहांकाळ(शिक्षण एम.ए. हिन्दी) कवठेमहांकाळ हास्य सम्राज्ञी पुरस्कार सावित्री महिला सेवाभावी बहुउद्देशिय संस्था कवठेमहांकाळ संस्थापक/अध्यक्ष कवठेमहांकाळ तालुका सखीमंच कवठेमहांकाळ तालुका राष्ट्रवादी महिला उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.त्यानी आतापर्यंत सामाजिक कार्यात प्रोत्साहन दिले.


महिलानी महिला चा दर्जा  उंच करावा त्यांना सन्मान द्यावा.त्याच्या  कलेचा सन्मान ठेवावा, या साठी  कवठेमहांकाळ तालुका सखीमंच आणि सावित्री महिला सेवाभावी बहुउद्देशिय संस्था कवठेमहांकाळ यांचे संयुक्त विद्यमानाने लावणी डान्स कार्यक्रम  कवठेमहांकाळ मध्ये पहिल्यांदा फक्त स्त्रियासाठी घेतला समाजसेवेचा वसा अखंड सुरूच ठेवायचा आहे,असेही सगरे सांगतात.महिला, मुलींना व्यासपीठ मिळवून देणे. 


त्यांच्या समस्या सोडवणे. त्यांना संघटित करून, विविध उपक्रम राबवणे. महिलांवरील अन्यायाला वाचा फोडणे. त्यांना न्याय मिळवून देणे. गोरगरीब जनतेसाठी, आजारी व्यक्तींसाठी मदतीचा हात घेऊन अस्मिता  सगरे या तन, मन, धन यासह नेहमीच सेवेत असतात.महिलांसाठी नारळ लढवणे स्पर्धा. हा कवठेमहांकाळ शहरातील किंबहुना  पहिला स्त्री शक्ती सहभागाचा  निमित्ताने यशस्वीपणे राबवला. त्यात सातत्यही राखले. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने महिलांसाठी गरबा-दांडिया पैठणीचा कार्यक्रम व विविध स्पर्धा उपक्रम. 


त्यात महिलांचा असणारा उत्स्फुर्त सहभाग. उल्लेखनीय राहिला.चळवळीच्या माध्यमातून मोलाची भूमिका बजावली स्वतःच्या माध्यमातून असुदेत नाहीतर इतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या, संस्थांच्या माध्यमातून असो,यांची असलेली तळमळ त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन घडवते.
Blogger द्वारे प्रायोजित.