Header Ads

जत येथे बचत गट कर्मचाऱ्याची रक्कम लुबाडण्याचा प्रयत्न


जत : जत येथील एका महिला बचत गटाचा कर्मचारी चाळीस हजार रुपये घेऊन जात असताना, त्याला रस्त्यात अडवून वाटमारी करण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत रोहित गुंडाप्पा खाटकर यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजता घडली आहे. परंतु खाटकर याने चोरट्यांशी झटापट केली. यात चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. शेवटी त्यांना पोबार केला.



 जत येथील मायक्रो फायनान्स व बचत गटाचा कर्मचारी म्हणून' रोहित गुंडाप्पा खाटकर काम करतात. ते बचत गटांनी कर्ज दिलेल्या हप्त्यांची वसुली करतात. ते शुक्रवारी सकाळी बनाळी येथील बचत गटांना दिलेल्या कर्जाच्या हप्त्यांची वसुली करण्यासाठी गेले होते. कर्जाची वसुली करून बनाळी - वायफळ रस्त्याने ते जतकडे परतत होते. दरम्यान, बनाळी वायफळ रस्त्यालगत बेरड वस्तीजवळ अज्ञात दोघा चोरट्याने रोहित यांना अडवून त्यांच्याजवळील पैशाची हिसकावण्याचा प्रयत्न केला.बॅग त्यांच्याजवळ चाळीस हजाराची रोख रक्कम होती. परंतु रोहित यांनी दोघाही चोरट्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.याचवेळी रस्त्याने दोन मोटरसायकलस्वार जात होते. त्यांनी हा प्रकार पाहिल्यानंतर चोरट्याने पलायन केले. 


शेगाव येथे कारची चोरी

जत; शेगाव (ता. जत) येथील श्रेयस सतीश चव्हाण यांची कार (क्रमांक एम एच १२ डीसी ८९६७)चोरीला गेल्याची फिर्याद पोलिसात दिली आहे.याबाबत अधिक माहिती अशी, श्रेयस चव्हाण यांची जुनी कार घरासमोर लावली होते. परंतु त्यांच्या घराजवळून सहा ऑक्टोंबर ते सात ऑक्टोबरच्या दरम्यान ही गाडी अज्ञात चोरट्याने चोरली आहे. या घटनेचा तपास जत पोलिस करीत आहेत.

Blogger द्वारे प्रायोजित.