Header Ads

संख मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले


करजगीे
,संकेत टाइम्स : जत तालुक्याच्या पूर्व भागाला वरदान ठरलेला संख मध्यम प्रकल्प सलग दुसऱ्या वर्षी शंभर टक्के भरला आहे,जत पुर्व भागात‌ परतीच्या‌ पावसाने गेल्या दहा दिवसापासून झोडपून काढले आहे.बोर नदी परिसरात होत असलेल्या पावसामुळे या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे.गेल्या दोन दिवसापासून सांडव्यातून पाणी बाहेर पडत आहे, पाणी पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे.जागतिक बँकेच्या सहकार्याने संख मध्यम प्रकल्प 1990 साली पूर्ण झाला होता. 


त्यानंतर कालव्याची कामे झाली होती.गत‌ पंधरा दिवसापासून जत तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने मध्यम प्रकल्पात येणारी बोर नदी दुथडी भरून वाहते आहे.धरण भरल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.यामुळे थेट उमदी-सोनलगी - सुसलाद पर्यतचा पाणी प्रश्न सुटणार आहे.


 
संख मध्यम प्रकल्प भरल्याने असे सांडव्यातून पाणी वाहत आहे.
Blogger द्वारे प्रायोजित.