Header Ads

कवठेमहांकाळ येथे राष्ट्रीय जंतनाशक दिन उत्साहात साजरा


कवठेमहांकाळ : राष्ट्रीय जंतनाशक दिन हा कार्यक्रम मुले व पौगंडावस्थेतील मुला मुलींसाठी जंताच्या आजाराचा सामना करण्यासाठी फेब्रुवारी २०१५ मध्ये सुरू करण्यात आला.जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मातीतून प्रसार होणाऱ्या कृमीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन जंतनाशक मोहिमेमधील अंतर ६ महिन्यापेक्षा जास्त नसावे म्हणून जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम १० ते १७ ऑक्टोबर या कालावधीत मॉपअप दिन म्हणून राबविण्यात येत आहे.या मोहिमेची अंमलबजावणी शाळा व समुदाय स्तराकरण्यात येत आहे.

                    
याच धर्तीवर कवठे महांकाळमध्ये आज दिनांक १० ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या निमित्ताने अंगणवाडी क्र.८८ आणि अंगणवाडी क्र. ८६ मध्ये मुलांना खाऊवाटप आणि जंताच्या गोळ्या वाटप करण्यात आल्या.यावेळी बोलताना डॉ.हर्षला कदम म्हणाल्या,१ ते १९ वर्षे वयोगटातील किमान २८ टक्के बालकांमध्ये आढळणारा आतड्याचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतापासून होतो.याचे प्रमुख कारण म्हणजे वैयक्तिक आणि परिसर स्वच्छतेचा अभाव असणे आहे.कृमीदोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण आहेच सोबत बालकांची शारीरिक आणि बौद्धिक वाढ खुंटण्याचे कारण ठरते.ही बाब लक्षात घेऊन १ ते १९ वर्षे वयोगटातील मुलांना शाळा आणि अंगणवाडी स्तरावर जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे,पोषण स्थिती आणि जीवनाचा दर्जा उंचावणे हा राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश आहे. 
              

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कवठेमहांकाळ महिला राष्ट्रवादीच्या आघाडीच्या शहराध्यक्षा मिनाक्षी माने,डाॅ.हर्षला कदम आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका नंदा माळी उपस्थित होत्या.यांच्यासोबत अंगणवाडी क्र.८८ च्या शिक्षीका दुर्गा पाटील,मदतनीस रोमा डवरी आणि अंगणवाडी क्र.८६ च्या शिक्षीका छाया वाले आणि मदतनीस शोभा पाटील तसेच लहान मुले आणि मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Blogger द्वारे प्रायोजित.