Header Ads

बाबरवस्ती शाळेत जागर स्वावलंबी शिक्षणाचा,वाचन प्रेरणा दिन




संख : जत तालुक्यातील बाबरवस्ती (पांडोझरी) जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत थोर शास्त्रज्ञ डॉक्टर.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस 'वाचन प्रेरणा दिन व वृत्तपत्र विक्रेता दिन'हात धुवा दिन उत्साहात साजरा झाला. डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन वृत्तपत्र विक्रेता अनिल सायगांव, आप्पासो गडदे, चंद्राबाई गडदे यांच्या हस्ते करण्यात आले.



मुख्याध्यापक दिलीप वाघमारे म्हणाले,"डॉ.कलाम साहेबांनी शालेय वयात वृत्तपत्रे घरोघरी पोहोचविण्याचे काम केले. यातून मिळालेल्या मोबदल्यामधून शिक्षणाला हातभार लागला.स्वकष्टातून स्वावलंबनाचे धडे त्यांनी गिरवले. हेच कलाम साहेब जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि भारताचे राष्ट्रपती झाले  देशांनी त्यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले. 



तानाजी कोकरे म्हणाले,सर्वांनी स्वच्छता का पाळली पाहिजे. जीवाणू आणि विषाणू पोटात जाण्यापासून बचाव होतो. त्यामुळे अनेक संसर्गजन्य रोग दूर ठेवण्यास मदत होते. त्यामुळे अर्थातच आजारपणांवर होणारा खर्च निश्‍चितच कमी होईल आणि आपल्या घरखर्चातील आरोग्यावरील खर्चात कपात होईल आरोग्याची काळजी घ्यावी.विनोद माने यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.दैनिक पुढारी तर्फे जागर स्वावलंबी  शिक्षणाचा हा उपक्रम संपूर्ण शाळेत अतिशय प्रभावीपणे राबविण्यात आला.
यावेळी केरुबा गडदे,आप्पासो गडदे,विनोद माने, ज्ञानेश्वर वाघमोडे,शिवाजी मांग, चंद्राबाई गडदे,शोभाबाई बाबर,दादू कोकरे शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थीनी, शिक्षक उपस्थित होते .
सुत्रसंचलन तानाजी कोकरे यांनी तर आभार ज्योती कोरे यांनी मानले
Blogger द्वारे प्रायोजित.