Header Ads

जत प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी वर्षात केले 605 अर्धन्यायीक दावे पारित


जत ; सरकारी एक काम आणि सहा महिने थांब, अशी अवस्था नेहमीच सरकारी कार्यालयात पाहायला मिळते, मात्र जत महसूल प्रशासनात गेल्या वर्षभरामध्ये नागरिकांच्या दावे-प्रतिदावे निकालात काढून झिरो पेंडन्सीच्या दृष्टीने प्रांत अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. एक वर्षात तब्बल 605 प्रकरण निकाली काढून सर्वसामान्यांची होणारी अबदा थांबवली आहे.


प्रकरणे निकाली काढल्याबद्दल वकील संघटनेच्यावतीने प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांचा सत्कार करण्यात आला. जत हा सांगली जिल्ह्यातला एक मोठा तालुका आहे.विस्ताराने देखील मोठा क्षेत्र असणाऱ्या तालुक्यांमध्ये जमिनीसह महसूल विभागातले अनेक प्रकरण प्रांत कार्यालयामध्ये धुळखात पडली आहेत, अर्धन्यायीक दावे प्रति-दावे अनेक प्रकरण प्रलंबित आहेत,याचा निपटारा करणे खरंतर गरजेचा आहे.मात्र त्याकडे नेहमीच दुर्लक्ष होत आलं,परिणामी सर्वसामान्यांची फरफट अनेक वर्षांपासून सुरू आहे.मात्र गेल्या वर्षभरामध्ये जत महसूल प्रशासनातला जमीन व अन्य अपिलात प्रकरण जसे सध्याचे प्रांताधिकारी जोगेंद्र कटारे यांनी अचूक पद्धतीने कायद्याच्या चौकटीत बसवून निकालात काढण्याचा सपाटा लावला आहे. 


एक वर्षांमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर गेल्या वर्षभरामध्ये प्रांताधिकारी श्री.जोगेंद्र कटारे यांनी तब्बल एक दोन नव्हे तर 605 प्रकरण निकाली काढले आहेत,ज्यातून पक्षकारांना देखील समाधान मिळाले आहे.झिरो पेंडन्सीच्या ध्येयातुन आणि नागरिकांचे हेल्पना थांबवण्याच्या उद्देशाने प्रांताधिकारी श्री.जोगेंद्र कटारे यांच्याकडून युद्धपातळीवर प्रलंबित अपील निकालात काढण्यावर जोर आहे,हे करताना कोणत्याही प्रकारचा अन्याय कोणत्याही पक्षकारावर होणार नाही,याची दक्षता ही प्रांताधिकारी कट्यारे यांनी घेतली. 
Blogger द्वारे प्रायोजित.