Header Ads

कवठेमहांकाळ येथे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंती साजरी


वठेमहांकाळ : मिसाईल मॅन आणि माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची आज जयंती. डॉ. कलाम यांनी देशाच्या कल्याणासाठी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. एक शिक्षक,शास्त्रज्ञ आणि राष्ट्रपती म्हणून डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांनी आपले संपूर्ण आयुष्य कठोर परिश्रम आणि लोकांच्या सेवेसाठी वाहून घेतले.त्यांची जयंती देशभरात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात येते.

                    

वाचाल तर वाचाल असे म्हंटले जाते.आजच्या २१व्या शतकात देखील ते आपल्याला तंतोतंत पटणारे आहे.आज शाळेत जाणारा विद्यार्थी असो अथवा महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना मोबाईल,टीव्ही,लॅपटॉप यापासून दूर करून त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करणे या प्रमुख उद्देशाने कवठे महांकाळ येथील श्री.महांकाली हायस्कूल येथे डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरी करण्यात आली.
                         

याप्रसंगी कवठे महांकाळ नगर पंचायतीचे बांधकाम सभापती संजय वाघमारे यांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक सुनील भोसले,राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष संजय कोळी,पर्यवेक्षक माने,बी.एन.चव्हाण,सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
Blogger द्वारे प्रायोजित.