वासुंबे फाटा : धोकादायक वळणावरील भिंत काढण्याचे काम सुरू
तासगाव : तागावकडून मनेराजुरीकडे जाणाऱ्या महामार्गावर वासुंबे फाटा येथील धोकादायक वळणावर सातत्याने अपघात होत आहेत. हे अपघात टाळण्यासाठी येथील वळण काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वळण काढून याठिकाणी सरळ रस्ता करण्यात येणार आहे. या रस्त्यास अडथळा ठरत असलेल्या पालिका हद्दीतील रस्त्याकडेची भिंत आज पाडण्यात आली.
शिवाय याठिकाणची झाडेझुडपे व इतर अडथळेही दूर करण्यात आले. या वळणावर होणाऱ्या अपघातांची संवेदनशीलता लक्षात घेऊन मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी तत्परतेने हे काम करून घेतले.