Header Ads

सांगलीवाडी येथे चौक सुशोभीकरण, स्वच्छ्ता मोहीम | *एन.एस.सोटी विधी महाविदयालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग*


सांगली  : देशातील स्वच्छता कर्मचारी हे अहोरात्र काम करून गाव, शहर, गल्ली मधील केर कचरा, गटर साफ करून नागरिकांनी रोग मुक्त ठेवत असतात. सफाई कामगारांना कृतज्ञता म्हणून लाल बहादुर शास्त्री व गांधी जयंतीचे औचित्य साधून या महापुरुषांना अभिवादन करत सांगली येथील एन.एस.सोटी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व निर्धार फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सांगलीवाडी येथील मुख्य चौक सुशोभीकरण, स्वच्छ्ता मोहीम हाती घेण्यात आली. यावेळी सांगलीवाडी चौक सफाईचे काम करण्यात आले. तसेच श्रीराम उद्यान येथील भिंतीला रंग देऊन सुशोभीकरण करण्याचे काम सुरू केले. 


ही मोहीम रबिवण्यास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अमित सवदी, सहायक प्राध्यापक अश्विनी कुलकर्णी, सहायक प्राध्यापक ए.डी.कुरणे, सहायक प्राध्यापक प्रसाद जोशी सर यांनी मार्गदर्शन केले. तर सहायक प्राध्यापक मनीष देशपांडे यांनी स्वच्छता दुत व निर्धार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राकेश दड्डनावर यांचा सत्कार केला व स्वतः देखील या मोहिमेत सहभागी झाले.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी न्याय, स्वंतत्रता, बंधुता हे तत्वे भारतीय संविधानात रुजवात सर्व नागरिकांना सन्मान दिला. देशातील विधी शाखेतील भावी वकिलांच्या एका हातात कलमाची ताकद ज्यातून ते या देशातील शोषित, पीडित, नागरिकांना न्याय देण्यासाठी वापरतील तर दुसरीकडे अहंकार, द्वेष भावना, उच्च-नीच, श्रीमंत गरीब, भेदभाव जातीवाद न बाळगता दुसऱ्या हातात   खराटा घेऊन स्वच्छता मोहीम राबवत समानतेचा संदेश देत गाडगेबाबा यांचे कार्य पुढे सुरू ठेवले.


यावेळी अमोल वेटम, रोहन पाटील, अभिषेक गदडे, प्रज्ञा सोळंकी, ऋतुजा शिरोटे, सिद्धांत शाह, सिद्धार्थ रणदिवे, किरण पाटील, अवधूत सुतार आदी विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
Attachments area
Blogger द्वारे प्रायोजित.