Header Ads

नरसिंहगाव येथे महिला कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिराचे आयोजन


कवठेमहांकाळ : आताच्या स्पर्धेच्या युगात स्वतःचे करिअर घडवताना प्रत्येकाने क्रमिक शिक्षणासोबतच कौशल्य प्रशिक्षणाचाही अंगीकार करायला हवा.विशेषतः सध्या लहान मुलांच्या शिक्षणाचा वाढलेला खर्च; तसेच बदलती जीवनशैली लक्षात घेता केवळ घरातील पुरुष सदस्याच्या उत्पन्नावर अवलंबून न राहता आत्मनिर्भर होण्यासाठी कौशल्य प्रशिक्षणाची निश्चित मोलाची मदत होऊ शकते तसेच महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा,त्यांचे निखळ मनोरंजन व्हावे आणि प्रत्येक महिलेला मनमुराद जगण्याचा आनंद घेता यावा या उद्देशाने कवठेमहांकाळ तालुक्यातील ग्रामपंचायत नरसिंहगाव आणि अनुसिध्द सेवाभावी एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवसीय महिला कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.


     कवठे महांकाळ तालुक्यातील नरसिंहगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे  दि. ९ ते १३ ऑक्टोबर या कालवधीत पाच दिवसीय महिला कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिर सुरू आहे.या शिबिराअंतर्गत विविध मसाले,वाढदिवसाचे केक,लोणचे,चटणी,ढोकळे तसेच विविध पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे.


      या शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून कवठेमहांकाळच्या महिला राष्ट्रवादीच्या आघाडीच्या शहराध्यक्षा मिनाक्षी माने,डॉ.हर्षला कदम,नरसिंहगावच्या उपसरपंच आसावरी कदम उपस्थित होत्या.या शिबिरात अश्विनी पोतदार आणि संपदा जोशी यांनी प्रशिक्षण दिले.उपस्थितांचे स्वागत संगीता‌ कदम यांनी केले.याप्रसंगी रूक्मिणी कदम,रूपाली कदम‌,प्रियांका कदम,उज्वला कदम,कमल कदम उपस्थित होते.शेवटी स्वाती शेंडगे यांनी आभार मानले.
Blogger द्वारे प्रायोजित.