Header Ads

फॅबटेकच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व नोकरी, व्यवसाय विषयी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न


सांगोला : फॅबटेक टेक्निकल कॅम्पसच्या इजिंनीअरिंग कॉलेजमध्ये विविध नामांकित कंपनीमध्ये भरती झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार  संस्थेच्या वतीने  अयोजीत करण्यात आला होता. त्याच बरोबर इजिंनीअरिंग प्रथम वर्षात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थीसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते.विविध नामांकित कंपनीमध्ये भरती झालेल्या सर्व  विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर विद्यार्थ्यांनी  आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये बोलताना ट्रांसफॉर्म-को  या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर ड़ेव्हलपर या पदावर काम करणारे  श्री विजय ‍‌‌चौगुले यांनी संभाषण कौशल्यचे महत्व सांगून कोणत्याही शाखेतून पदवी पूर्ण केली असले तरी उत्तम संधी मिळू शकते असे सांगितले. 



तसेच फॅबटेक मधील सर्व शिक्षक वर्ग अतिशय उत्कृष्ट रित्या शिक्षण देत आहेत  असे सांगितले. कॉग्निझंट या कंपनीमध्ये  सॉफ्टवेअर ड़ेव्हलपर  म्हणून काम करणारे  आशितोष चव्हाण यांनी फॅबटेकमध्ये झालेल्या विविध ट्रेनिंगचे कसे फायदे झाले हे सर्वाना पटवून दिले. तर टोयोटा कंपनीमध्ये काम करणारे  शहाजी इगोले यांनी कंपनीबद्दलची माहिती दिली तसेच उद्योजक बनण्याचे  आव्हान  केले. स्पॉरटॉन टेक्नालॉजीमध्ये काम करणारे तनवीर इनामदार यांनी शाखा निवडताना कोअर शाखेची निवड करण्याबद्दल  मार्गदर्शन केले. रॉबर्ट बुश मध्ये काम करणाऱ्या हर्षदा इगोले तसेच टीसीएस  कंपनीमध्ये कार्यरत असलेली कोमल गायकवाड व स्नेहल कदम यांनी सर्व शिक्षकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केल्याचे सांगितले. त्याचबरोबर संस्थेचे व संस्थापकांचे त्यांनी आभार मानले.


 त्यानंतर  कॉम्पुटर सायन्स  विभागाचे विभाग प्रमुख डॉ ठिगळे यांनी एमएच - सीईटी  प्रवेश  प्रणालीचे तसेच विविध प्रवेश फेरी संदर्भात
मार्गदर्शन केले.इंजिनीअरिंगचे अकॅडमीक समन्वयक प्रा. पराग दौड़े यांनी करियर गाईडन्स वरती मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले डॉ. सतीश लकडे यांनी विविध कंपनीमध्ये भरती विषयी मार्गदर्शन केले  व  त्या संदर्भातील तयारी करण्यास सर्व विद्यार्थांना प्रेरणा दिली.  फॅबटेक इंजिनीअरिंगचे प्राचार्य डॉ. आर बी शेंडगे यांनी संस्थेमध्ये चालू असलेल्या एमपीएससी, युपीएससी, गेट परीक्षा मार्गदर्शन केंद्राविषयी तसेच विविध ट्रेनिंग प्रोग्रामविषयी माहिती दिली. 

हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन मा. श्री. भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर श्री.अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व समारोप संस्थेचे ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ. साहेबगौडा संगणगौडर  यांनी केले.

Blogger द्वारे प्रायोजित.