Header Ads

पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांचा उमदी येथे भव्य नागरी सत्कार | - रुग्णवाहिकेचेही लोकार्पण होणार


बालगाव : उमदी ता.जत येथे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेशभाऊ खांडे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार असून यावेळी संजय (आण्णा) तेली युथ फाउंडेशन उमदी यांच्या वतीने नुतन रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष विलास तळ्ळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.



 यावेळी अध्यक्ष विलास तळ्ळी  म्हणाले की, सांगली जिल्ह्याला नव्याने निवड झालेले पालकमंत्री सुरेश भाऊ खांडे यांचा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य सत्कार करण्यात येणार आहे व संजय आण्णा तेली युथ फाउंडेशनच्या वतीने सर्व सोयी नियुक्त अशा नुतन रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ही रुग्णवाहिका उमदी जिल्हा परिषद गटातील प्रत्येक कार्यकर्ते व रुग्णांच्या मदतीसाठी मोफत दिली जाणार आहे. 


तसेच यावेळी उमदी जिल्हा परिषद गटातील भाजप पदाधिकारी निवडी करून निवडीचे पत्र दिले जाणार असल्याचे ही सांगण्यात आले. यावेळी माजी आमदार विलासराव जगताप, आमदार गोपीचंद पडळकर, भाजपा जिल्हाध्यक्ष बाबा देशमुख, तालुकाध्यक्ष प्रमोद सावंत सह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी रवी शिवपुरे, संगम ममदापुरे, रोहित शिंदे, राजु कोकळे, रवी लोणी, अभिमन्यू लोणी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Blogger द्वारे प्रायोजित.