Header Ads

बाज येथे एकास मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल


जत: बाज (ता. जत) येथे ऊस तोडण्यासाठी पैसे घेऊनही कामास न आल्याने विश्वनाथ विलास बंडगर (रा.बाज) यांना काठीने डोक्यात मारहाण करुन गंभीर जखमी करण्यात आले.याप्रकरणी विशाल रघु गडदे, विकास रघु गडदे, रघु गडदे (सर्व रा. बाज) यातिघांवर जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत विश्वनाथ बंडगर यांनी फिर्याद दिली आहे.बुधवारी सकाळी ही घटना घडली आहे.



पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, बाज येथील विश्वनाथ बंडगर यांनी ऊस तोडण्यासाठी येतो म्हणून रघु गडदे, विशाल गडदे यांच्याकडून पैसे घेतले होते. परंतु ते गडदे यांच्यात ऊस तोडण्यासाठी गेले नव्हते. बंडगर हे बुधवारी सकाळी बाज गावातील एका बँकेसमोर गेले होते.त्याठिकाणी संशयितांनी पैशांबाबत त्यांना विचारणा केली.यावेळी झालेल्या वादात संशयितांनी बंडगर यांना लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण केली.
Blogger द्वारे प्रायोजित.