Header Ads

कापूसखेड येथील तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात


इस्लामपूर : कापूसखेड ता.वाळवा येथील तलाठी सुनिल बाबूराव जावीर,(रा. मिरजवाडी, ता. वाळवा) यांला १५ हजार रुपये रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.अधिक माहिती अशी,तक्रारदार यांची आई वारस असलेली बागायत शेत जमीन इतर वारसानी तक्रारदार यांचे आईस विना मोबदला सह दुय्यम निबंधक वाळवा यांचे कार्यालयात कायम व खुष खरेदीपत्राने स्वखुशीने लिहुन दिलेली आहे.सदर जमीनीचे खुष खरेदीपत्राचा ऑनलाईन फेरफार तलाठी कापुसखेड यांचे लॉगीनला गेला होता. तक्रारदार यांनी त्यांचे नोंदीचे काम झाले काय याबाबत कापुसखेड गांवचे तलाठी सुनिल जावीर यांचेकडे चौकशी केली असता तलाठी जावीर यांनी तक्रारदार यांचे आईचे नांवाने झालेल्या कायम व खुषखरेदी पत्राची सात बारा उताऱ्यावर नोंद धरणे करीता तक्रारदार यांचेकडे १५ हजार रुपये व तक्रारदार यांचे नातेवाईकांचे तलाठी सुनिल जावीर यांचेकडे असलेल्या कामाचे १५ हजार रुपये असे दोघांचे दोन कामाचे ३० हजार रुपये लाचेची मागणी केली असल्याबाबत तक्रारदार यांनी दि.१४ नोंव्हेबर २०२२ रोजी अॅन्टी करप्शन ब्युरो सांगली कार्यालयात दिला होता.तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता त्यामध्ये लोकसेवक सुनिल जावीर, तलाठी कापुसखेड यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांचे व त्यांचे नातेवाईकांचे असे दोघांचे मिळुन ३० हजार रूपये लाच मागणी करून तक्रारदार यांचे नातेवाईक हे बाहेरगांवी असल्यामुळे तक्रारदार यांचे आईचे नांवच्या कायम खुष खरेदीपत्राची अधिकार अभिलेखात नोंद धरणे करीता १५ हजार रुपये लाच मागणी करुन १५ हजार रुपये लाच रक्कम आणून देण्यास सांगीतल्याचे निष्पन्न झाले.


त्यानंतर दि.१६ नोंव्हेबर रोजी तलाठी कार्यालय कापुसखेड या ठिकाणी सापळा लावला असता लोकसेवक श्री. सुनिल जावीर, तलाठी कापुसखेड यांनी तक्रारदार यांचेकडे १५ हजार रुपये लाच मागणी करुन तलाठी कार्यालयाचे बाहेर असलेल्या त्यांच्या अल्टो कारमध्ये ठेवण्यास सांगितली.त्यानंतर तक्रारदार यांनी तलाठी सुनिल जावीर यांचे सांगणे प्रमाणे १५हजार रुपये लाच रक्कम जावीर यांचे अल्टो कारमध्ये ठेवल्यानंतर लोकसेवक सुनिल जावीर तलाठी कापुसखेड पळून गेले आहेत.तलाठी जावीर यांचे वाहन ताब्यात घेतले असून तलाठी सुनिल जावीर यांचा शोध सुरु आहे.याप्रकरणी इस्लामपूर पोलीस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे.सुजय घाटगे,(पोलीस उप अधीक्षक)विनायक भिलारे,दत्तात्रय पुजारी(पोलीस निरीक्षक) यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे.तक्रारी करण्याचे आवाहन

नागरिकांना आवाहन करण्यात येते की, लाच मागणी संबंधाने तक्रारी असल्यास पोलीस उपअधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग, बदाम चौक, सांगली. येथे अथवा कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०२३३/२३७३०९५ वर तसेच हेल्प लाईन क्रमांक १०६४ वर तसेच व्हॉट्स अॅप नंबर ७८७५३३३३३३ व मोबाईल नंबर ८९७५६५१२६२ तसेच खालील संकेतस्थळावर संपर्क साधावा.


Blogger द्वारे प्रायोजित.