Header Ads

आमदार सुमनताई पाटील यांच्या हस्ते पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचा शुभारंभ




कवठेमहांकाळ : तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार सुमनताई आर.आर.(आबा)पाटील यांनी कवठे महांकाळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी तालुक्यात विकासकामांचा धडाकाच लावला आहे.शासनाच्या माध्यमातून तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेशभाऊ पाटील आणि युवानेते रोहितदादा पाटील यांच्या साथीने स्वखर्चातून विविध सामाजिक,सांस्कृतिक उपक्रम तसेच आरोग्य शिबिरे आयोजित करत तालुक्याचा सर्वांगीण विकास करीत तळागाळातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे देखील कार्य आमदार सुमनताई पाटील यांच्याकडून घडत आहे.


तालुक्यातील करोली(टी) येथील नागरिकांना काही दिवसापासून अपुरा आणि खंडित पाणी पुरवठ्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत होते.ही बाब लक्षात घेत करोली(टी) येथील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्याच्या उद्देशाने आज दिनांक १६ रोजी आमदार सुमनताई पाटील यांच्या हस्ते जलजीवन योजनेतून पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी मार्केट कमिटीचे सभापती प्रशांत शेजाळ,सरपंच समाधान पवार,चेअरमन अजित पाटोळे,हेमंत पाटील,म्हैशाळचे सरपंच शहाजी एडके,उपसरपंच विशाल पाटोळे,दरीबा पाटोळे,चिनु पाटील,पत्रकार संजय बनसोडे आदी मान्यवरांच्या सोबत मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
Blogger द्वारे प्रायोजित.