Header Ads

राजे रामराव महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची वारसा स्थळांना भेट


जत : दि २७ सप्टेंबर २०२२ रोजी "जागतिक पर्यटन दिन " याचे औचित्य साधून जत येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या वतीने वारसा स्थळास भेट (वारसा मुशाफिरी) या अभिनव उपक्रमांतर्गत वारसा स्थळ भेट अभ्यास सहलीत सुमारे १२० विद्यार्थ्यांनी खानापूर तालुक्यातील शुकाचार्य व किल्ले बाणुरगड (बहिर्जी नाईक समाधी स्थळ) या ऐतिहासिक स्थळांना प्रत्यक्ष भेटी देऊन दैदिप्यमान संस्कृतीचा वारसा सांगणाऱ्या स्थळांचे अभ्यासपूरक परीक्षण केले. 


यावेळी शुक्राचार्य व परिसरासंदर्भात ऐतिहासिक, भौगोलिक, औद्योगिक, पर्यावरण, जैवविविधता, औषधी वनस्पती,  इ. गोष्टींचे विद्यार्थ्यांनी अभ्यासात्मक सर्वेक्षण केले. महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. राजेंद्र लवटे, डॉ. शंकर गावडे,  प्रा. नारायण सकटे, प्रा. पुंडलिक चौधरी, प्रा. गोविंद साळुंके, डॉ. संगिता देशमुख, प्रा. नवनाथ लवटे, प्रा. अतुल टिके, समन्वयक प्रा. अनिल लोखंडे, तसेच विविध विभागातील विद्यार्थ्यांच्या उस्फुर्त सहभागातून अभ्यास सहल संपन्न झाली.


Blogger द्वारे प्रायोजित.