Header Ads

कवठेमहांकाळ येथील वर्दीतील दुर्गा स्त्रीशक्ती :महिला पोलीस सविता दुबोले | नवरात्रीनिमित्त दुर्गा स्पेशल स्टोरी

 


कवठेमहांकाळ : आदिशक्ती म्हणून स्त्रीशक्तीचा कौतुकमिश्रित गौरव केला जातो. विशेषत: महिला दिनी व नवरात्रोत्सवात तर स्त्री सामर्थ्याचा अभूतपूर्व जागर होत असतो. वास्तवात आजही ही आदिशक्ती कोणाच्या तरी कृपेवर जगते असेच वातावरण बव्हंशी आढळते. महिला सक्षमीकरण, स्त्री स्वातंत्र्य हे केवळ बोलाची कढी अन् बोलाचाच भात असल्याचे अनुभव पावलोपावली येत असतात. विविध क्षेत्रे आज महिलांनी पादाक्रांत केली.नवरात्र म्हणजे नऊ दिवस चालणारा स्त्रीशक्तीचा उत्सव.भक्ती-शक्ती व कृषी संस्कृतीचे प्रतीक असणारे नवरात्रीचे मंगल पर्व सुरु झाले आहे.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलातील स्त्रीशक्तीच्या कार्याचा यथोचित गौरव करणे गरजेचे वाटते.



अशाच स्ञी शक्ती असणाऱ्या महिला पोलीस सविता दुबोले ह्या होत.कवठेमहांकाळ पोलीस ठाणे येथे कर्तव्यवर असणाऱ्या सविता दुबोले या 2013 साली महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाल्या शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या सविता दुबोले यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून जिद्दीच्या जोरावर तिने 2013 साली महाराष्ट्र पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न बाळगून धूड संकल्पना मनी बाळगून आपल्या स्वप्न अस्तित्वात उतरवले त्यांचे मूळ गाव तासगाव तालुक्यातील सिद्धीवाडी हे आहे.


कवठेमहांकाळ पोलीस ठाणे येथे ड्युटी करत असून पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गोडे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे पोलीस उपनिरीक्षक अक्षय ठिकणे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चांगल्या प्रकारे आपले ड्युटी करत आहेत पोलीस ठाणे येथे तक्रार देणाऱ्या महिलांना चांगल्या प्रकारे वागणूक देऊन त्यांच्या समस्या व त्यांना न्याय देणाऱ्या वर्दीतील दुर्गा आँँन ड्युटी २४ तास काम करत असते तसेच २४ तास ड्युटी बरोबरच त्या वर्दीतील आई आहेत.सविता दुबोले ह्या ड्युटीवर असताना आपल्या मुलाशी व्हिडिओ कॉल करुन बोलतात.त्या कामावर असताना मुलांना पती व सासुबाई सांभाळ करतात.आम्ही जनतेच्या सेवेसाठी नेहमीच सज्ज आहोत असे महिला पोलीस वर्दीतील दुर्गा सविता दुबोले यांनी सांगितले
Blogger द्वारे प्रायोजित.