Header Ads

वसंतदादा कारखान्याची कर्ज मुक्तीकडे वाटचाल


सांगली : वसंतदादा कारखान्याची ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दि. २७/०९/२०२२ रोजी दुपारी २.०० वाजता अत्यंत उत्साहात व खेळी मेळीच्या वातावरणात पार पाडली.कारखान्याचे चेअरमन विशाल पाटील यांचे अध्यक्षतेखाली व संचालक मंडळाच्या उपस्थितीत कारखाना कार्यस्थळी सभा पार पाडली. सभेच्या सुरुवातीस दिप प्रज्वलन व वसंतदादांच्या प्रतिमेस पुष्पाअर्पण करुन सभेस सुरुवात झाली. याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन विशाल पाटील यांनी प्रास्ताविक व मनोगत व्यक्त करतांना त्यांनी कारखान्यावर असणारे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शिल्लक कर्ज पुढील कालावधीत देवून कारखाना सर्व देण्यातून कर्ज मुक्त होईल असा त्यांनी सर्व सभासद शेतकऱ्यांना ठाम विश्वास दिला. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तरे देवून सभासद शेतकऱ्यांची मने जिंकली. या प्रसंगी कार्यक्षेत्रातील ऊसनोंद व ऊस तोडणी प्रोग्रॅम याबाबत श्री. दत्त इंडिया समवेत समन्वय साधला जाईल. कारखान्यास सभासदांनी मोठ्या प्रमाणात गळीत होणेकरिता ऊसपुरवठा करणेचे आव्हान केले. तसेच सभासदांना सवलतीच्या दरांत साखर वाटप करीत आहोत.




तसेच व्ही. एस. आय पुणे येथे कार्यक्षेत्रातील सभासदांना विशेष प्रशिक्षणासाठी कारखान्यामार्फत पुणे येथे पाठविणेबाबत निर्णय झाला. तसेच सभासदांनी वारस नोंद पुर्तता करुन शेअर्स वर्ग करुन घ्यावेत असे आव्हान केले. तसेच कारखान्याचे इरिगेशन विभागाकडील बिसुर व नावरसवाडी ड्रिप योजना पायलट प्रोजेक्ट स्किम येथे गेल्या दोन वर्षापासून अत्यंत उत्कृष्टपणे सुरु असून त्याचा आदर्श घेवून इतर कमांड एरियातील गावांनी टिंबक ड्रिप योजनेसाठी कारखान्याच्या इरिगेशन विभागाकडे संपर्क साधावा जेणे करुन कारखान्याच्या सहकार्यातून अशा योजना पुर्ण करण्याची ग्वाही दिली. शेतकरी संघटनेचे प्रदिप पाटील, प्रभाकर पाटील, मिलींद खाडीलकर व अनिल शिंदे व तसेच इतर सभासदांनी प्रश्न विचारले असता त्या प्रश्नांचे निरसन चेअरमन श्री. विशाल पाटील यांनी केले.



यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन सुनिल आवटी, संचालक अमित पाटील, यशवंतराव पाटील, अशोक अनुगडे, शिवाजीर पाटील, संपत माने, संभाजी मेंढे, सुरेश पाटील, गणपतराव सावंत, राजेंद्र पाटील, तसेच जिल्हा परिषद सदस्य, विशाल चौगुले, सेक्रेटरी प्रकाश पाटील, व लिगल ऑफिसर व्ही. एम. कुंभार, हॅमत कुरणे, श्री. दत्त इंडियाचे सिक्युरिटी अधिकारी व स्टाफ, सर्व अधिकारी व कर्मचारी व सर्व सभासदांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.सभेच्या सुरुवातीस कारखान्याचे कार्यकारी संचालक संजय पाटील यांनी स्वागत करुन श्रध्दांजली वाहून अहवाल व नोटीस वाचन केले तर कारखान्याचे संचालक श्री. अमित पाटील यांनी आभार मानले. राष्ट्रगीत होवून सभा खेळीमेळीत संपन्न झाली.
Blogger द्वारे प्रायोजित.