Header Ads

डफळापूर जिप शाळेतील विद्यार्थ्यांची पोष्ट ऑफिसला क्षेत्र भेट


डफळापूर : अधुनिक तंत्र ज्ञानाच्या युगामध्ये पत्राचा व्यवहार खूप कमी होत आहे.विद्यार्थ्यांनी पोष्टा बद्ल आपुलकी व जवळीकता निर्माण व्हावी.यासाठी इयता १ ली च्या विद्यार्थ्यांच्या साठी पत्र म्हणजे काय आहे.हे जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना परिसरातील एका विशिष्ट जागेला भेट देण्याने मुलांच्या मनामध्ये त्या विषयी अधिक माहितीचे ज्ञान व अनुभव विकसीत होण्यास मदत होते.


पोष्ट आफिसला भेट दिल्या नंतर पत्राचे विविध प्रकार, पत्राचा प्रवास कसा असतो,पत्र कशामध्ये पॅक केली जातात , गांवानुसार, राज्यानुसार पत्राची विभागणी  कशी केली जाते.त्याचप्रमाणे विविध पोष्ट तिकीट पत्र पेटी इत्यादीची माहिती व्यवस्थापक पोष्ट मास्टर बी.पी.कोळी यांनी विद्यार्थ्यांना दिली.त्यांच्या सोबत सहायक पोष्ट मास्टर श्रीम एम.एम. सुर्यवंशी,एम.आर.भेंडे, बीआरसीचे विषयतज्ञ सुरेंद्र सरनाईक उपस्थित होते  . क्षेत्र भेटीचे नियोजन सौ.रेखा कोरे व श्रीम अजेंता लोंढे यांनी केले.पोष्ट ऑफिस कडून मुलांना खाऊ चे वाटप करण्यात आले..इ.१ ली चा विद्यार्थी कु.अनुज माळी यांनी आभार मानले .

Blogger द्वारे प्रायोजित.