Header Ads

नगराध्यक्षा अश्विनी पाटील यांच्या हस्ते देशिंग कॉर्नर येथील पथदिव्याचे उद्घाटन

 कवठेमहांकाळ : शहरात नगरपंचायत होऊन जवळपास सहा वर्षे लोटली तरी अद्याप देशिंग कॉर्नर परिसरात पथदिवे बसविण्यात आलेले नव्हते.यामुळे स्थानिक नागरिकांना,दुकानदारांना, पादचाऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता.शहरातील जवळपास अर्ध्याहून जास्त दवाखाने याच परिसरात असल्याने रात्री अपरात्री येणाऱ्या रुग्णांची,रुग्णांच्या नातेवाइकांची गैरसोय होत होती.याच कॉर्नर परिसरातून देशींग,खरशिंगकडे तसेच हिंगणगाव,सलगरेकडे जाणारा रस्ता असल्याने वाहनांची वर्दळ देखील जास्त असल्याने अंधारात अपघाताचे प्रमाण देखील वाढले होते.

             
या सर्व बाबींची गंभीर दखल घेत तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार सुमनताई पाटील आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेशभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवानेते रोहीत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कवठे महांकाळ नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा अश्विनी पाटील आणि राष्ट्रवादीचे युवक शहर अध्यक्ष महेश पाटील यांच्या पुढाकाराने देशींग कॉर्नर परिसरात पथदिवे बसविण्यात आले.त्याचे आज उद्घाटन करण्यात आले.प्रदीर्घ कालावधी पासून असलेले देशींग कॉर्नर परिसरातील अंधाराचे साम्राज्य दूर झाल्याने नगराध्यक्षा अश्विनी पाटील आणि युवक शहर अध्यक्ष महेश पाटील यांच्या या कार्याचे कवठे महांकाळ शहरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.


            
या पथदिव्यांच्या उद्घाटन प्रसंगी कवठे महांकाळ नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा अश्विनी पाटील,राष्ट्रवादीचे युवक शहर अध्यक्ष महेश पाटील,नगरसेवक रणजित घाडगे,नगरसेवक अजित माने,नगरसेवक विश्वनाथ उर्फ बंडू पाटील,ईश्वर वनखेडे,जगन्नाथ शिंदे,सोमनाथ लाठवडे,अजित पाटील तसेच राष्ट्रवादीचे इतर पदाधिकारी,कवठे महांकाळ नगर पंचायतीचे कर्मचारी,नगरसेवक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Blogger द्वारे प्रायोजित.