Header Ads

नवतंत्रज्ञान युक्त शेतीसाठी मार्गदर्शनाची गरज | - लिंबाजी सोलनकरजत : पारंपारिक शेतीला फाटा देऊन नवतरुण नव तंत्रज्ञान युक्त शेतीकडे वळत आहे व चांगल्या पद्धतीने शेती करत असल्याचे ग्रामीण भागातील चित्र आहे. या नव तरुणांना उत्पादकक्षमता वाढवणारे पिके, भाजीपाला, फळबागा लागवड याविषयी मार्गदर्शनाची गरज आहे. विविध उपक्रमातून व माध्यमातून कृषी सल्लागार,तथा स्पिक कंपनीचे पश्चिम महाराष्ट्र इन्चार्ज कल्याण पाटील नवोदित युवक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत .त्यांचा फायदा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त होत आहे. असे प्रतिपादन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लिंबाजी सोलनकर यांनी केले.


येळवी (ता.जत) येथे नवज्योत अग्रोटेक संस्थेच्यावतीने कृषी सल्लागार व कृषी क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या स्पिक कंपनीचे पश्चिम महाराष्ट्र इन्चार्ज कल्याण पाटील यांनी कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.यावेळी बोलत होते.यावेळी मनोज वुळागड्डे, माजी उपसरपंच मच्छिंद्र खिलारे, नवनाथ पवार, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम सुतार, मुख्याध्यापक भारत क्षिरसागर, अरुण कारंडे आदी उपस्थित होते.

Blogger द्वारे प्रायोजित.