Header Ads

स्वराज्य शिंदे जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेमध्ये द्वितीय


आंवढी : जिल्हा परिषद प्राथ.केंद्रशाळा वाळेखिंडी ता.जत येथील स्वराज्य सुरेश शिंदे यांने जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला.ऐतिहासिक कथा या विषयावर गड आला पण सिंह गेला ही छत्रपती शिवाजी महाराज व तानाजी मालुसरे यांच्या अतूट संबंधाची कथा सादर करून जिल्हा स्तरावर दुसरा क्रमांक पटकावला. त्याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. 




गावचे पंचायत समिती सदस्य शिवाजी शिंदे, सरपंच माधवी पाटील, उपसरपंच अनिता शिंदे,शाळा व्यवस्थापन समिती, माता-पालक संघ या सर्वांनी त्याचे कौतुक करून अभिनंदन केले. तसेच त्याला शाळा स्तरावर विशेष तयारी करून घेणारे शिक्षक राहुल टकले व महादेव रणदिवे याचेही अभिनंदन केले. त्याला मुख्याध्यापक सुभाष टेकाळे व इतर शिक्षक संगीता टकले, अमोगसिद्ध  बिराजदार व रिहाना नदाफ यांचे  मार्गदर्शन लाभले. 
Blogger द्वारे प्रायोजित.