Header Ads

तुकाराम बाबा महाराज 'जीवन गौरव' पुरस्काराने सन्मानित


जत : कोरोनाच्या कठीण काळात तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांना रयतेचा कैवारी या संस्थेच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. राज्यभरातील निवडक व्यक्तींना रयतेचा कैवारी संस्थेच्या वतीने पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. यंदाचा मानाचा जीवन गौरव पुरस्कार  तुकाराम बाबा महाराज यांना मिळाल्याबद्दल जत तालुक्यातील त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


जत येथील दिलीप मारोती वाघमारे ,बाबरवस्ती,  मिरज येथील शिक्षक अमोल संभाजी शिंदे यांनाही आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.पनवेल येथील बापूसाहेब डी. डी. विसपूते महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात सत्कार सोहळा संपन्न झाला. रयतेचा कैवारीचे प्रमुख शाहू संभाजी भारती यांच्या हस्ते तुकाराम बाबा महाराज यांना जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. भगवानसिंह राजपूत, धनराज विसपुते, शिक्षण विभागाच्या उपसंचालिका मनीषा पवार,  ज्ञानेश्वर म्हात्रे,  दीपक भुजबळ,  संजीवन जगदाळे, अनिल बोरनारे, सुनिता चांदोरकर, मिठ्ठू आंधळे, दिलीप वाघमारे आदी उपस्थित होते.


तुकाराम बाबा महाराज यांनी कोरोनाच्या कठीण काळात सलग दोन वर्ष गोरगरिबांना जीवनावश्यक किट, घरपोच भाजीपाला, मास्क, सॅनिटायझर वाटप केले. दुष्काळ, अतिवृष्टी, महापूर ,अपघात, जळीत घटना असो की नैसर्गिक आपत्ती यावेळी तुकाराम बाबांनी मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून काम केले. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचे रयतेचा कैवारीचे प्रमुख शाहू संभाजी भारती यांनी सांगितले. तुकाराम बाबा हे राष्ट्रीय संत गाडगेबाबा, संत बागडेबाबा यांच्या विचाराचा वारसा जपत असल्याचे गौरवोदगार काढत भारती यांनी तुकाराम बाबांच्या कार्याचे कौतुक केले.


सत्काराला उत्तर देताना तुकाराम बाबा यांनी आजचा तरुण हा मोबाइलमध्ये हरवत चालला आहे. त्यांनी मोबाइलच्या दुनियेतून बाहेर यावे आणि खरे आयुष्य काय आहे समजून घेऊन वाटचाल करावी. तरुणांनी समाजकार्याकडे वळावे, स्वतःला झोकून देवून कार्य करावे असे आवाहन केले.

■ तुकाराम बाबांच्या कार्याने उपस्थित अचंबित
जत सारख्या दुष्काळी भागात तुकाराम बाबा महाराज यांनी केलेल्या कार्याचा ज्यावेळी आढावा कार्यक्रमामध्ये घेण्यात आला त्यावेळी तुकाराम बाबा महाराज यांनी केलेले कार्याचे सर्वांनी कौतुक तर केलेच पण त्याचबरोबर सर्व उपस्थित अचंबित झाले होते. श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटना अपघाताच्या वेळी, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी करत असलेल्या कामाचे मान्यवरांनी कौतुक केले.
Attachments area


Blogger द्वारे प्रायोजित.