Header Ads

श्री दत्त विद्यालयामध्ये हिंदी दिन समारोह


जत : येथील श्री. दत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये मोठ्या उत्साहात 14 सप्टेंबर हा हिंदी दिवस म्हणून साजरा करण्यात आला.या कार्यक्रमांमध्ये उपस्थित सर्व शिक्षक- शिक्षीकांचे माननीय मुख्याध्यापक लोखंडे याच्याहस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत सत्कार करण्यात आले.हिंदी दिनानिमित्त विद्यालयात हिंदी निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले होते.या स्पर्धेत प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थिनीना सर्व शिक्षकांच्या शुभहस्ते बक्षीस देण्यात आले.


याप्रसंगी सांगली माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष, राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक, हाजीसाहेब मुजावर आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की,भारतातील व विदेशातील 70 करोड लोक दैनंदिन जीवनामध्ये हिंदीचा उपयोग करतात व तसेच अमेरिकेतील 43 विद्यापीठात हिंदी विषय हा अभ्यासक्रमात आहे.  1918 च्या हिंदी साहित्य संमेलनात महात्मा गांधीजी म्हणाले होते  हिंदी भाषा जनमानसाची भाषा आहे. 1949 मध्ये स्वतंत्र भारतात राजभाषेच्या प्रश्नावर संविधानात सर्वांनी विचारांती निर्णय घेतला की भारतीय संविधानाचा 17 व्या अध्याय मध्ये कलम 343 ( एक )मध्ये भारतामध्ये राजभाषा हिंदी व तिची देवनागरी लिपी असेल. 25 मार्च 2015 पासून दिल्लीच्या विज्ञान भवन मध्ये राष्ट्रभाषा हिंदी मध्ये अमूल्य कामगिरी करणाऱ्यांना राजभाषा गौरव पुरस्कार आणि राजभाषा कीर्ती पुरस्कार राष्ट्रपतींच्या शुभ हस्ते दिले जातात.
          

सूत्रसंचालन विद्यार्थिनी मोनिका शेळके हिने केले. प्रास्ताविक भाषण हिंदी विषय शिक्षक चंद्रकांत ऐवळे यांनी,आभार एच एन यादव सर यांनी मानले.क्रीडा शिक्षक शेख सर, माने सर ,पाटील मॅडम, डी एन यादव, कुमारी ताई भिमराव होनमाने,तृप्तीदेवी माधवराव बावधनकर व कृष्णा कोंडीकीरे उपस्थित होते.
Blogger द्वारे प्रायोजित.