Header Ads

सरकारने जुनी पारिभाषित पेन्शन लागू करावी : हाजीसाहेब मुजावर


जत : नवीन अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पारिभाषित पेन्शन योजना लागू करा या प्रमुख मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व निम सरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती द्वारा सिटी पोस्ट बस स्टॉप चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय सांगली पर्यंत  बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये विविध संघटनांचे हजारो कार्यकर्ते बाईक घेऊन सहभागी झाले व नंतर रॅलीचे रूपांतर सभेत झाले .


   

याप्रसंगी सांगली माध्यमिक शिक्षक संघाचे (फेडरेशन) अध्यक्ष हाजीसाहेब मुजावर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, राज्यातील आमदार व खासदार फक्त पाच वर्षे समाजसेवा करतात व जुनी पेन्शन व अन्य आर्थिक लाभापोटी अब्जावधी रुपये घेतात आणि आयुष्यातील 30 ते 40 वर्षे सेवा करूनही शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळत नाही ही बाब शासनाच्या नैतिकतेला धरून नाही.
हाजीसाहेब मुजावर म्हणाले, प्रगतशील लोक कल्याणकारी व पुरोगामी महाराष्ट्र शासनाने, राजस्थान,झारखंड, छत्तीसगड व गोवा या राज्याप्रमाणे एन. पी. एस. रद्द करून राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना तात्काळ जुनी पारिभाषित पेन्शन लागू करावी, अन्यथा बेमुदत आंदोलन करू,असेही मुजावर म्हणाले.
Attachments area
Blogger द्वारे प्रायोजित.