Header Ads

जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी निधी द्यावा | - शिक्षकदिनी आंदोलन


जत : जत शहरातील नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळासाठी जिल्हा परिषदेचा निधी मिळेना आणि नगरपरिषदेचा पण निधी तांत्रिक अडचणीच्या कारणाने खर्च करता येत नसल्याने शाळाची अवस्था दयनीय झाली आहे.या शाळासाठी तातडीने निधी द्यावा,या मागणीसाठी 
शिक्षकदिनी जत पंचायत समिती समोर विद्यार्थी पालकांसह लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.यावेळी सरपंच परिषदेचे अध्यक्ष बसवराज पाटील, आरपीआय अध्यक्ष संजय कांबळे, बाजचे प्रवीण गडडे, सागर शिनगारे,नामदेव बेळली सर,संतोष माळी , प्रहारचे बागडे,विकास लेंगरे,अमोल माने,माणिक माळी,नगरसेविका जयश्री मोटे,सरपंच दीपक लांगोटे, ओंकार बंडगर,समाधान माळी,मोहन माळी,राजू मोटे,यशवंतराव चव्हाण आदी सहभागी झाले होते


नगरपरिषद हद्दीतील शाळेला भौतिक सुविधेसाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला ना जिल्हा परिषदेचा निधी ना नगरपरिषदेचा निधी उपलब्ध होत नाही म्हणून जिल्हाधिकारी यांनी खास बाब म्हणून जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून जत शहरातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या भौतिक सुविधा उपलब्ध करण्याची मागणी विक्रम ढोणे यांनी  लक्षवेधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केली आहे

     crossorigin="anonymous"></script>
<!-- Ad code -->
<ins class="adsbygoogle"
     style="display:block"
     data-ad-client="ca-pub-7910159458519737"
     data-ad-slot="8238773747"
     data-ad-format="auto"
     data-full-width-responsive="true"></ins>
<script>
     (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
</script>
त्याशिवाय तालुक्यातील अनेक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या इमारती धोकादायक बनल्या आहेत अनेक शाळांचे निर्लेखित प्रस्ताव प्रशासनाकडे धूळ खात पडून आहेत तर अनेक शाळांचे स्ट्रक्चल ऑडिट होणे बाकी आहे याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे म्हणून या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षकदिनी लक्षवेधी आंदोलन करण्यात आले 


Blogger द्वारे प्रायोजित.