Header Ads

आसंगी (जत) येथे रक्तदान,डोळे तपासणी शिबिर संपन्न


माडग्याळ : आसंगी (जत )येथे स्वराज्य जननी जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था शिवाजीनगर व लायन्स क्लब ऑफ माडग्याळ सिटी,आयोजित श्रीगणेशोत्सवाव निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले.


 डॉशिरगावकर रक्तपेढी सांगली व हिट्टी हॉस्पिटल ब्लड स्टोरेज सेंटर माडग्याळ यांनी नियोजन केले. हिराई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलकडून मोफत डोळे तपासणी करण्यात आले.यावेळी श्री. रामदास खोत (संपर्कप्रमुख महाराष्ट्र राज्य प्रहार अपंग संघटना ) डॉ. सार्थक हिट्टी,श्री सावंत सर ,श्री.सीताराम गायकवाड, नेताजी खरात,गणेश पवार  तसेच हिराई हॉस्पिटल, शिरगावकर रक्तपेढीचे कर्मचारी, संस्थेचे सर्व पदाधिकारी, गावातील नागरिक तरुण वर्ग, सरपंच ,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. 


या कार्यक्रमांतर्गत 50 गरजू लोकांचे संस्थेमार्फत मोफत डोळे तपासणी करण्यात आली. 50 हून अधिक जणांनी रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य केले. या कार्यक्रमाचे संयोजक संस्थेचे संस्थापक /अध्यक्ष श्री योगेश गायकवाड आणि मंडळातील पदाधिकाऱ्यांनी केले होते.
Blogger द्वारे प्रायोजित.