Header Ads

राज्य सीईटी सेलमार्फत बी.फार्मसी प्रवेश प्रक्रिया सुरु


कवठेमहांकाळ : बी फार्मसी या अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.ऑनलाईन पद्धतीने अर्ज 28 सप्टेंबर या तारखेपासून सुरवात झाली आहे.विद्यार्थ्यांना सीईटी मध्ये नॉन झिरो गुण असणे आवश्यक आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने सीईटी परीक्षेचा निकाल काही दिवसापूर्वी जाहीर केला आहे.त्यानंतर प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे.बी फार्मसी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी सीईटी मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचे प्रवेश होणार आहेत. प्रवेश प्रक्रियेच्या पुढील फेऱ्या,पात्रता,नियमावली तसेच प्रवेशाची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना सीईटी सेलच्या www.mahacet.org या संकेतस्थळावर मिळणार असल्याचे  उपप्राचार्य प्रमोद चिक्कोडी यांनी सांगितले.


              बी फार्मसी हा एक चार वर्षाचा पदवी कोर्स आहे यामध्ये प्रामुख्याने ड्रग्ज आणि औषधे या विषयी शिकवले जाते . ज्या विद्यार्थ्यंना फार्मसी क्षेत्रात संशोधन नोकरी किंवा औषधाचे दुकान सुरु करायचे आहे त्यांच्या साठी बी फार्मसी कोर्से हा एक उत्तम पर्याय आहे. बऱ्याच वेळा विदयार्थ्यांच्या मनात हा देखील प्रश्न येतो कि ग्रुप कोणता  असावा ,जर तुमचा PCM ,PCB  किंवा PCMB यापैकी कोणताही ग्रुप असला तरी तुम्हाला बी फार्मसी साठी प्रवेश मिळतो ओपन साठी ग्रुप साठी १३५ तर इतर कास्ट मधील विद्यार्थ्याना १२० गुण असणे आवश्यक आहे. राज्य सीईटी सेलच्या परीक्षेच्या गुणांच्या आधारावर मेरिट लिस्ट लावली जाते व त्यानंतर विद्यार्थ्यंना आपल्या आवडत्या कॉलेज मध्ये प्रवेश घेऊ शकतात बी फार्मसी कोर्सला प्रवेश घेण्यासाठी CET परीक्षा अनिवार्य आहे.
 बी फार्मसी  कोर्से पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करू शकतात. ड्रुग्स इन्स्पेक्टर, संशोधन ऑफिसर मेडिकल ट्रान्सक्रिप्शन,केमिस्ट प्रोफेसर ,ड्रग थेरपिस्ट अश्या बऱ्याच क्षेत्रात आपली उल्लेखनीय कामगिरी करू शकता. 

त्यासोबत बी फार्म  नंतर विद्यार्थी स्वतःला स्टेट फार्मसी काउंसिल अंतर्गत रजिस्टर होऊन स्वतः औषधाचे दुकान चालवू शकतात.राष्ट्रीय आरोग्य न्याय संशोधन संस्थेच्या  चेअरमन डॉ नुतन माळी  सेक्रेटरी डॉ.रामलिंग माळी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवनवीन दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी कटिबध्द असणारे नुतन कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ अमोल पाटील यांनी २०१९ पासून नरसिंहगाव येथे बी फार्मसी  कोर्स सुरु केला आहे. 


तसेच विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण हेच या महाविद्यालयाचे प्रमुख वैशिष्ट असून बी फार्मसी ला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी  ३ नोव्हेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून या प्रवेश प्रक्रियेमध्ये समाविष्ट होण्याचे आवाहन उपप्राचार्य प्रमोद चिक्कोडी यांनी कले आहे.
Blogger द्वारे प्रायोजित.