सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या मानेताई | सामाजिक कार्यातील दुर्गा सुलोचना माने
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव गावच्या सुलोचना माने १९८६ पासून समाजकार्यात उत्तुंग भरारी घेत आहेत.लहानपणापासूनच त्यांना समाजकार्याची आवड होती. समाजामध्ये अनेक लोक घडतात.त्याप्रमाणे लोकांनी निर्माण केलेल्या कार्यकर्तीचे खरे कार्य कौतुकास्पद आहे.सर्वसामान्यांचे नेतृत्व करत असताना एक कार्यकर्त्या सुलोचना माने समाज सेवकाच्या रूपाने कवठेमहांकाळ तालुक्याला लाभल्या.समाजकार्याच्या लाल मातीत लढणाऱ्या बुलंद व्यक्तिमत्वाच्या कार्यकर्त्यांसह सुलोचना माने स्त्रियांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी सतत आग्रभागी असल्याने सांगली जिल्ह्याला त्या परिचित आहेत.कर्तुत्वाला मातृत्वाची जोड असल्याशिवाय नेतृत्व निर्माण होत नाही हे खरंच आहे.
पांडेगावातील कैकाडी समाजात गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या सौ.माने यांनी कवठेमहांकाळ तालुक्यात समाजसेवेचे वृत्त जोपासले आहे.त्यांचे कार्य एक अखंड प्रकाशदीप लाभल्याप्रमाणे आहे. दलित व सर्वसामान्य जनतेसाठी काहीतरी केले पाहिजे या ध्येयाने प्रेरित झालेल्या सौ. माने यांनी समाजकार्यात एक आगळा वेगळा ठसा उमटवलेला आहे.म्हणून त्या जिल्ह्यात दिनदलितांमध्ये सर्वदूर परिचित आहेत. समाजासाठी अत्यंत तळमळीने काम करणारे हे बुलंदी नेतृत्व स्वाभिमानाने जगताना त्यांना कोणाचीच लाचारी पत्करली नाही. लग्नानंतरही त्यांनी समाजसेवेत खंड पडू दिला नाही.कणखर बाण्याच्या व्यक्तिमत्वाने अखंडपणे समाजकार्यात वाहून घेतले. या चिरतरुण व्यक्तिमत्व व जिल्ह्यातील गोरगरीब अन्यायग्रस्त जनतेसाठी खूप काही काम केले.पण त्यांना कार्याची कधी प्रसिद्धी केली नाही.१९८६ पासून त्यांनी शासकीय योजनेच्या माध्यमातून लोकांची कामे करण्यास सुरुवात केलेली आहेत.सर्वप्रथम त्यांनी शिवण क्लास सुरू केला.त्यातून त्यांनी अडीचशे महिलांना प्रथम स्वावलंबण्याची दिशा दिली. होतकरू मुलीना स्वतःच्या पायावर उभे करून जगण्याची संधी दिली.
आपल्या सामाजिक कार्यावर निष्ठा ठेवून राजकारण विरहित समाजकारण करीत वास्तव आणि कलानुरुप प्रसंगाशी मेळ घालण्याची प्रयत्न केला.युवतीच्या आशास्थान असलेल्या या महिला व्यक्तिमत्व आणि युवा शक्तीला समाजकार्यात गुंतवण्याचे काम केलं. महाराष्ट्रीयन कैकाडी समाजाच्या १९९४ साली झालेल्या देशव्यापी परिषदेत सांगली जिल्ह्यात महिला प्रचारकांची प्रमुख जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पार पडली. १५ ऑगस्ट १९९४ साली युती शासनाच्या काळात अनेक महिलांना एकत्रित करून झुणका भाकर केंद्र चालवून अभियान यशस्वीपणे पार पडले. समाजाच्या सक्रिय सहभागातून त्यांनी केलेल्या कामाच्या जोरावर त्यांची आ.भा.कैकाडे समाज परिषदेच्या कार्यकारी मंडळावर संचालिका म्हणून निवड झाली.त्यानंतर महिला आघाडी प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक झाली भटक्या-विभक्त जातीसाठी सौ माने यांनी केलेले समाज कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे.नवरात्री निमित्त त्यांच्या समाजकार्यास व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा....!