Header Ads

जत एसटी आगारने बससेवा सुधारावी | - विकास साबळे


जत,संकेत टाइम्स : शालेय विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक वयोवृद्ध ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर इत्यादी लोकांसाठी उपयोगी असणारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बसेस आहेत.जत आगारातील अनेक बसेसची परिस्थिती अतिशय वाईट आहे,त्याशिवाय प्रवाशांना सेवा व्यवस्थित दिली जात नाही.वेळेवर बसेस सोडल्या जात नाहीत,ग्रामीण भागातील अनेक फेऱ्या बंद‌ आहेत.बसेसच्या दुरूस्तीचाही मोठा प्रश्न आहे.त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जत आगाराकडे लक्ष देऊन कारभार सुधारावा, अशी मागणी आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे यांनी केली आहे.

साबळे म्हणाले, जत आगारात असणाऱ्या बसेस पैंकी ६० ते ७० टक्के बसेस खराब असून त्यामध्ये अनेक गाडीचे पत्रे बाहेर लोंबकळत आहेत.खिडकीच्या काचा तुटलेले असतात.कोचिंग शीट फाटलेली आहेत.ड्रायव्हरला बसायला सीट चांगल्या नाही.बरेचसे ड्रायव्हर तारेने गुंडाळलेले सीटवर बसलेले असतात,काही गाड्यांना लाईट लागत नाही.काही गाड्यांचे वायपर चालू नाहीत तर काही गाड्यांचा स्टार्टर लागत नाही. टायर निकामी झालेले असतात, अशा अनेक समस्याकडे आगार प्रमुख यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही साबळे यांनी केला.


बसेस सुरक्षित नसतानाही चालक व वाहक जीवाची परवा न करता जत तालुक्यातील खेड्यापाड्यासह लांब पल्याच्या गाड्या चालवत आहेत. त्यांच्याबरोबर 50/60 प्रवाशांना घेऊन जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.दुसरीकडे लांब पल्याच्या रूटवर खाजगी बसेस चांगल्या सुविधा देत आहेत,त्यामुळे त्यांच्याकडे प्रवासी वळत आहेत.त्यामुळे एसटी महामंडळच्या अडचणीत वाढ होत असून उत्पन्न घटत आहे.जत आगार एकेकाळी जिल्ह्यात सर्वाधिक महसूल देणारे आगार होते.मात्र आता परिस्थीती बदलली आहे.वरिष्ठ अधिकारी,आगार व्यवस्थापक,कर्मचाऱ्यांनी गांर्भिर्यांने लक्ष देऊन आगाराचे वैभव परत आणावे,असे आवाहनही साबळे यांनी केले आहे.
Blogger द्वारे प्रायोजित.