Header Ads

शिक्षकांचे प्रश्न शिक्षक भारतीने मांडले शिक्षणमंञ्याकडेजत : मुख्यालयी राहण्याच्या मुद्द्यावरून रविवारी औरंगाबाद येथे शिक्षक भारतीच्या पुढाकाराने
शिक्षकांनी विभागीय आयुक्त कार्यालयावर शिक्षक सन्मान रॅली काढली. शिक्षक भारती संघटनेने हा प्रश्न आता थेट ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यापुढे मांडला आहे, अशी माहिती शिक्षक भारती जत तालुका अध्यक्ष दिगंबर सावंत यांनी दिली.


आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्राथमिकचे राज्याध्यक्ष नवनाथ गैंड, शिक्षक भारती केंद्रप्रमुख संघटनेचे अध्यक्ष अरुण मडके, प्रकाश दाणे, भरत शेलार, सुभाष मेहेर, महेंद्र बारवाल, राजेश भुसारी, दत्तात्रय कोकडे, प्रशांत नरवडे यांनी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांची मंत्रालयात भेट घेतली. शिक्षकांसाठी मुख्यालयाच्या ठिकाणी राहण्याची अट रद्द करावी, अशी मागणी यावेळी केल्याचे त्यांनी सांगितले.


ते म्हणाले सर्व अशैक्षणिक कामातून शिक्षकांची मुक्तता, जुनी पेन्शन, जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया,वस्तीशाळा शिक्षकांना मूळ नियुक्ती दिनांकाचा लाभ, पदवीधर शिक्षकांना सरसकट ४३०० रुपये ग्रेड पे केंद्र प्रमुखांचे प्रश्न सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगत योजनेचा लाभ ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत गणवेश, विद्यार्थिनींना एक ऐवजी १० रुपये उपस्थित भत्ता आणि शिक्षण विभागातील शिक्षकांसह रिक्त पदे भरणे यांसह इतर प्रश्नांबाबत तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्री महाजन यांनी दिले. यामुळे निश्चित प्रश्न सुटतील, असेही सावंत म्हणाले.
Blogger द्वारे प्रायोजित.