Header Ads

भिवर्गीचा मल्लिकार्जुन गुरव जिल्हास्तरीय गायन स्पर्धेत तिसरा


भिवर्गी : जिल्हास्तरीय गायन स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा भिवर्गी शाळेने यश मिळविले.जिल्हा परिषद शिक्षण विभाग सांगली यांच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय गायन स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेचे विद्यार्थी कु.मल्लिकार्जून बाळकृष्ण गुरव याने तृतीय क्रमांक पटकावला.सांस्कृतिक परंपरा नसताना सुद्धा स्वतःच्या जिद्धीवर त्याने हे यश मिळवले आहे.


ग्रामीण भागात वाढ झालेल्या या विद्यार्थ्याने ताल लय सुर यांत प्रावीण्य मिळवले. मुख्याध्यापक अंबादास शिंदे,सरपंच मदगोंडा सुसलाद,शंकर हंजगी,कुबेर काळे, तमदंडी सर,घाटगे सर, भवर सर,भोये सर, जाधवर सर यांचे मार्गदर्शन मिळाले. युसूफ मुल्ला करजगी,श्रीकांत हिरेमठ उटगी यांनी संगीत दिले.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोविंद बजबळकर,पालक बाळकृष्ण गुरव यांनी अभिनंदन केले.


Blogger द्वारे प्रायोजित.