Header Ads

सायली आमणे व सुभायु आमणे यांचे सुयश | विटा येथील डिव्हाईन इंटरनॅशनल स्कुलच्या शिक्षिका व विद्यार्थ्यांचे स्पर्धेत नेत्रदीपक यश

 


विटा : विटा येथील डिव्हाईन इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी नाशिक येथे झालेल्या स्पर्धांमध्ये घवघवीत व नेत्रदीपक संपादन केल्यामुळे त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.


नाशिक येथे पार पडलेल्या स्टेट ओपन अँड मास्टर मीट इंडियन ऍथलेट्स लीग स्पर्धेमध्ये विटा येथील डिव्हाईन इंटरनॅशनल स्कुलचा विध्यार्थी कु. राजवर्धन धर्मेश पाटील याने जावलीन थ्रो खेळामध्ये तृतीय क्रमांक पटकावला आहे. तर याच शिक्षण संस्थेचा दुसरा विद्यार्थी कु. शुभायु मुरली आमणे  याने 100 मीटर व 80 मीटर अडथळा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.


तसेच पोदार जम्बो किड्स विटाच्या शिक्षिका सौ. सायली मुरली आमणे  यांनी शॉट पुट रनींग 60 मीटर आणि शॉट पुट रनींग 100 मीटर स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. सायली आमणे यांनी प्राथमिक शिक्षणापासून हायस्कूल व महाविद्यालयात शिक्षण घेत असताना कराड येथे विविध स्पर्धेत सहभाग घेऊन नेत्रदीपक यश संपादन केलेले आहे. विविध स्पर्धेत नेहमीच सायली आमणे यांचा सहभाग राहिला आहे. नाशिक येथील स्पर्धेसाठी डिव्हाईन इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तसेच शिक्षिका सायली आमणे व सुभायु आमणे हे आई व मुलगा असून स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.


डी. आर नाईक -निबांळकर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष अमृतराव नाईक -निबांळकर, इन्स्टिट्यूटच्या सचिव सौ. मीनाक्षी नाईक - निबांळकर, डिव्हाईन इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक सचिन गायकवाड,शाळेच्या अॅडमिन विलेशा पद्मन, प्री स्कूलच्या सेंटर हेड सौ. जयश्री राहुल पुळूजकर, केंद्रप्रमुख अनु प्राचार्य यांनी स्पर्धेत यश मिळविलेल्या शिक्षिका, विद्यार्थ्यांचा सत्कार करून अभिनंदन केले आहे.
Blogger द्वारे प्रायोजित.