Header Ads

आरोग्य विभागाचा मनमानी कारभार सुधारा अन्यथा, क्रंतिदिनी आंदोलन - विक्रम ढोणे





जत : जत तालुक्यामध्ये 8 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 45 उपकेंद्राच्या माध्यमातून आरोग्य सुविधा पुरविल्या जातात पण ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र हे शासन नियमानुसार न चालविता अधिकाऱ्यांच्या मनमानी पद्धतीने सुरू आहे हा कारभार शासन नियमानुसार करावा अन्यथा क्रांतीदिनी तालुका वैद्यकीय कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्याचा इशारा युवा नेते विक्रम ढोणे यांनी निवेदनाव्दारे तालुका वैद्यकीय अधिकारी यांना दिला.

जत तालुक्यातील आरोग्य विभागाचे कामकाज सकाळी साडे आठ ते दुपारी एक आणि दुपारी चार ते सहा हे शासकीय नियम असताना प्रत्यक्षात तालुक्यामध्ये अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या मनमानी पद्धतीने कारभार करत आहेत याकडे तालुका वैद्यकीय अधिकारी यांना वारंवार निदर्शनास आणून दिले होते पण यामध्ये कोणताही बदल होत नाही
शनिवार 30 जुलै रोजी शेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली असता आरोग्य सहायक आणि शिपाई यांच्या व्यतिरिक्त कुणीही अधिकारी ,कर्मचारी उपस्थित नव्हते ही गंभीर बाब जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप माने आणि तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संजय बंडगर यांच्या निदर्शनास आणून दिली आहे

या अनुषंगाने तालुक्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र यांच्या दर्शनी भागावर सुस्पष्ट असे कामकाजाच्या वेळा,संबधित अधिकारी कर्मचारी यांचे नाव ,पदनाम, मोबाईल नंबर,आणि शासकीय फी आणि नागरिकांची सनद क्रांतीदिनापूर्वी सर्व केंद्रात लावावी अन्यथा तालुक्यातील जागरूक युवकांना सोबत घेऊन क्रांतीदिनी तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयासमोर निदर्शन आंदोलन करण्याचा इशारा युवा नेते विक्रम ढोणे यांनी दिला आहे
Blogger द्वारे प्रायोजित.