Header Ads

लकडेवाडी शाळेत निर्भया पथकाकडून मार्गदर्शन


जत : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लकडेवाडी ता जत या शाळेत जत पोलीस स्टेशनच्या निर्भया पथकाच्या माध्यमातून पोलीस कॉन्स्टेबल विजया कुंभार, कांतीलाल हिप्परकर, व निशांत कांबळे यांनी निर्भया पथकाचा उद्देश, त्याचे काम याविषयी माहिती विद्यार्थी व विद्यार्थिनींना शारीरिक सुरक्षिततेबाबत ‘गुड टच ,बॅड टच’ यासह इतर विषयांवर मार्गदर्शन केले. 

सध्याच्या युगामध्ये सुरक्षित राहणे ही काळाची गरज आहे. संकटाच्या काळात किंवा संकट आल्यावर कशाप्रकारे त्या संकटावर मात करायची. मुलींच्या व महिलांच्या सुरक्षेसंदर्भात घ्यावयाची काळजी यासंदर्भात विजया कुंभार यांनी यावेळी सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यक्रमा दरम्यान शिक्षक लखन होनमोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक तसेच शिवाजी करवर यांनी आभार मानले.
Blogger द्वारा समर्थित.