Header Ads

जत नगरपरिषदेकडून राष्ट्रीय झेंडा वाटप


जत: शासनाच्या वतीने आयोजित घर घर तिरंगा कार्यक्रमांतर्गत जत नगरपरिषद जत व रामपूर ग्रामपंचायत कार्यालय इथे राष्ट्रीय झेंडा वाटप आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

भारतीय राष्ट्रध्वजाचा इतिहास जितका गौरवशाली आहे, तितकाच तो ब्रिटिशांच्या काळात संघर्षपूर्णही राहिला आहे. शेकडो स्वातंत्र्यसैनिक क्रांतिकारकांनी त्यासाठी तुरुंगवास पत्करला, प्रसंगी बलिदान दिले. पंडीत जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला तिरंग्याला उद्देशून केलेल्या भाषणात, आपण हा एकदा उंचावलेला ध्वज, देशातील शेवटचा भारतीय जोपर्यंत जिवंत आहे,तोपर्यंत तो डौलाने फडकत ठेवणे आपली जबाबदारी आहे,अशी देशवासियांना साद घातली. आज त्याच स्वतंत्र लढ्यातील मानाचं पान ठरलेला तिरंगा आजही डौलाने फडकत आहे. आणि यापुढेही तो डौलाने फडकत राहणार आहे यात शंका नाही.


यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वाघमोडे, जत तालुका काँग्रेस तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार, माजी सभापती बाबासाहेब कोडग, नगराध्यक्ष शुभांगी बननेवर, जत नगरपरिषद चे नगरसेवक पदाधिकारी नागरिक उपस्थित होते
Blogger द्वारे प्रायोजित.