Header Ads

लायन्स क्लब ऑफ माडग्याळ सिटीचा शपथविधी व पदग्रहण सोहळा संपन्न


जत : लायन्स क्लब ऑफ माडग्याळ सिटी चा शपथविधी व पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न झाला.नूतन अध्यक्ष नेताजी खरात यांची निवड यावेळी कार्यक्रमाचा शुभारंभ मावळते अध्यक्ष डॉक्टर सार्थक हिट्टी यांनी घंटानाद करून केली तर ध्वजवंदन ला.सौ.कविता खरात यांनी केले मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात केला.


नूतन अध्यक्ष लायन नेताजी खरात, सेक्रेटरी ला. गणेश पवार व खजिनदार ला. प्रसाद हिट्टी यांची निवड करण्यात आली व सर्व नवीन पदाधिकारी व संचालक मंडळास शपथ व पदग्रहण प्रमुख पाहुणे प्रांतपाल राजशेखर कापसे यांच्या शुभहस्ते देण्यात आली.


यावेळी प्रांतपाल राजशेखर कापसे यांनी लायन्स क्लबच्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे कार्य व महत्व व त्यांच्या शाखा विषयी सविस्तर माहिती दिली.नूतन अध्यक्ष नेताजी खरात यांनी यापुढील काळात समाजातील गरजवंत घटक नजरे समोर ठेवून सेवाकार्य करण्याचा संकल्प केला
तसेच या चालू वर्षापासून युवकांना प्रेरणा देण्यासाठी त्यांच्या आई-वडिलांचा लायन्स आदर्श माता पिता पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.सौ व श्री शकुंतला नामदेव माळी (माडग्याळ) सौ व श्री शिवबाई बिराप्पा डोंबाळे( कुलाळवाडी) सौ व श्री काशीबाई आप्पासो मुटेकर  (राजोबाचीवाडी ) सौ व श्री शांताबाई चंद्रशेखर हिरेमठ( उटगी ) सौ व श्री मंजुळा भिवा सोलनकर(सोरडी) यांचा सत्कार करण्यात आल.

 यावेळी कॅबिनेट ऑफिसर डॉक्टर रविंद्र आरळी, जीएसटी कॉर्डिनेटर डॉक्टर वीरेंद्र चिखले, रिजन चेअरमन दिनकर पतंगे, डॉक्टर शेखर हिट्टी, झोन चेअरमन डॉक्टर सार्थक हिट्टी ,क्लब एक्सटेंशन चेअरमन डॉ. रवींद्र हत्तळ्ळी व आदी मान्यवर उपस्थित होते.या वेळी हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी ला.सुभाष मोरे,शिवशंकर राठोड,प्रशांत बोगार, ज्ञानेश्वर पवार ,तात्यासो मुळीक रमेश पवार, बाबु भालकी यांचे सहकार्य लाभले ,सूत्रसंचालन प्राध्यापक घनश्याम चौगुले सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रसाद हिट्टी यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने केली.
Attachments area
Blogger द्वारे प्रायोजित.